Nashik : नाशिकमध्ये अतिक्रमण काढण्याच्या अफवेमुळे गोंधळ, पोलिसांवर दगडफेक|VIDEO

Nashik Kathe Galli stone pelting : नाशिकच्या काठे गल्ली परिसरात अतिक्रमण हटावाची अफवा पसरली आणि जमाव बिथरला. पोलिसांवर दगडफेक, अनेक वाहनांचे नुकसान, ४ पोलिस जखमी. परिस्थिती तणावपूर्ण.
Nashik Stone Pelting News
Nashik Stone Pelting News
Published On

Nashik Stone Pelting News : नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात मंगळवारी रात्री अफवेमुळे दगडफेकीची गंभीर घटना घडली. जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेत तीन ते चार पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, पाच वाहनांचेही नुकसान झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने संतप्त जमावाने दगडफेक केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

मंगळवारी रात्री काठे गल्ली परिसरात अतिक्रमण काढण्याची अफवा पसरल्याने वातावरण तापले. रात्रीच्या वेळी ४०० हून अधिक लोकांचा जमाव जमला आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी ५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. तरीही जमावाला नियंत्रित करणे आव्हानात्मक ठरले. दगडफेकीमुळे परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला, ज्यामुळे तणाव आणखी वाढला.

२० हून अधिक पोलीस जखमी

नाशिकमध्ये जमावाने केलेल्या दगडफेकीत २ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि २० हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे समजतेय. दगडफेक करणाऱ्या जमावातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ८ ते १० जणांना ताब्यात घेतले आहे.

Nashik Stone Pelting News
Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप होणार? शिंदे-ठाकरेंमध्ये डिनर डिप्लोमसी, मनसे-शिवसेना युतीची राज्यात चर्चा | VIDEO

नाशिक महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०२५ रोजी काठे गल्लीतील एका अनधिकृत दर्ग्याला नोटीस बजावली होती. या नोटीसीत स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते, अन्यथा तोडकामाचा इशारा देण्यात आला होता. या नोटीसीनंतर परिसरात तणाव वाढत गेला आणि अफवांमुळे परिस्थिती चिघळली.

Nashik Stone Pelting News
Beed : वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर, पोलीस अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ, व्हिडिओ व्हायरल

परिसरात तणावपूर्ण शांतता

नाशिक पोलिसांनी तातडीने परिसरातील वाहतूक मार्गात बदल केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. पोलिसांनी जमावाला पांगवले. दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तसेच, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. सध्या काठे गल्ली परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, दगडफेकीत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com