Nashik News : नाशिकमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त, बडी दर्गा, दूध बाजार परिसरात जमावबंदी; परिसरात तणावपूर्व शांतता

Nashik Two Group Clash : जुन्या नाशिकमधील दूध बाजार, बडी दर्गा आणि अन्य परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. याशिवाय शहरात जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आले आहेत.
Nashik Latest News
Nashik Latest NewsSaam TV
Published On

नाशिक शहरातील भद्रकाली परिसरात शुक्रवारी (ता १७) दोन गटात वाद झाला. यावेळी एका गटाने दुसऱ्या गटावर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये ११ पोलिसांचा देखील समावेश आहे. याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या परिसरात तणावपूर्व शांतता आहे.

Nashik Latest News
Bhandara News : भंडाऱ्यातील तुमसरमध्ये हिट अँड रनचा थरार, मद्यधुंद कारचालकाने सायकलस्वार मजुरांना उडवलं

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी (Police) केलंय. सध्या जुन्या नाशिकमधील दूध बाजार, बडी दर्गा आणि अन्य परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनाद करण्यात आलाय. याशिवाय शहरात जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात शुक्रवारी नाशिकमध्ये (Nashik News) सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. हिंदू समाजाच्या आवाहनाला अनेक व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

त्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. पण नाशिकच्या भद्रकाली परिसरात काही दुकानं सुरु होती. दरम्यान, सकल हिंदू समाजाची रॅली भद्रकाली परिसरात पोहोचली. त्यावेळी आंदोलकांनी दुकानदारांना दुकान बंद करण्याचं आवाहन केलं. पण काही दुकानदारांनी त्यास विरोध केला.

यामुळे दोन गट आमने-सामने आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळी एका गटाने दुसऱ्या गटावर तुफान दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनाही न जुमनता काही समाजकंटकांनी दगडफेक सुरुच ठेवली.

या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जखमींमध्ये ११ पोलिसांचा देखील समावेश आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तसेच काही परिसरात जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आले आहेत.

Nashik Latest News
Nashik Clashes: नाशिक बंदला हिंसक वळण; जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुरांचा मारा, जमावाकडून पोलिसांवर दगडफेक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com