Chhatrapati Sambhajinagar Fire Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Fire: इलेक्ट्रिक वाहनामुळे ७ जणांचा बळी? छत्रपती संभाजीनगरमधील आगीच्या घटनेत नेमकं काय घडलं?

Electric Vehicle Explosion 7 Killed : छत्रपती संभाजीनगरमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक गाडीचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Rohini Gudaghe

रामनाथ ढाकणे साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Fire News Update

छत्रपती संभाजीनगरमधील छावणी कॅन्टोन्मेंट परिसरातील तीन मजली इमारतीला भीषण आग (Chhatrapati Sambhajinagar Fire) लागली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. छावणी परिसरात जैन मंदीराजवळ ही घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इलेक्ट्रिक गाडीचा स्फोट (Electric Vehicle Explosion) झाल्यामुळे ही आग लागल्याचं स्थानिक सांगत आहेत.  (Latest Marathi News)

आज पहाटे तीन वाजेदरम्यान ही घटना घडली आहे. घटनास्थळी बचाव कार्यासाठी कॅन्टोन्मेंट अधिकारी, कर्मचारी आणि छावणी पोलीस दाखल झाले आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बचावकार्य करण्याचा प्रयत्न (Chhatrapati Sambhajinagar News) केला. परंतु, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन बालक, तीन महीला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आग कशामुळे लागली, हे पोलीस तपासात समोर येईल. मृतकांचे शव घाटी रुग्णालयात अॅम्बूलन्सने पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, आग कशामुळे लागली याची माहिती पोलिसांनी अजूनपर्यंत दिलेली (Fire News) नाही. आगीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बाहेर इलेक्ट्रिक गाडी चार्जिंगला लावलेली होती. त्या गाडीमध्ये स्पोट झाला. त्यानंतर दुकानाला आग लागली. साडेतीन वाजेच्या सुमारास आग लागली, तेव्हा अग्निशामन दलाला माहिती देण्यात आली. मात्र, अग्निशमन दल आणि पोलीस योग्य वेळेत पोहचू शकले नसल्याचा आरोप देखील नागरिकांनी (Fire News Update) केलाय. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे.

आगीत मृत्यू झालेले सातजण एकाच कुटुंबातील आहेत. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहेत. परी वसीम शेख (2 वर्ष मुलगी), आसिम वसीम शेख (3 वर्ष मुलगा), वसीम शेख (30 वर्ष), हमीदा बेगम (50 वर्ष), (Fire Accident) तन्वीर वसीम ( महिला 23 वर्ष), शेख सोहेल (35 वर्ष), रेश्मा शेख (22 वर्ष) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Government Scheme: या सरकारी योजनेत लाडक्या बहिणींना मिळतात २ लाख रुपये; मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे तरी काय?

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT