अजय दुधाणे साम टीव्ही, बदलापूर
बदलापूरच्या (Badlapur Fire) खरवई एमआयडीसीत असलेल्या एका केमिकल कंपनीला आज दुपारी (२ एप्रिल) आग लागली. डि.के. फार्मा असं या केमिकल कंपनीचं नाव आहे. आग लागल्याचं समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात (Fire News) आलं. जवळच असलेल्या बदलापूर अग्निशमन दलाच्या फायर सेंटरमधून दोन गाड्या घटनास्थळी आग विझवण्यास पोहचल्या आहेत. (Latest Marathi News)
आगीवर नियंत्रण मिळविण्याचं काम सुरू आहे. बदलापूर अग्निशमन दल आणि अंबरनाथ अग्निशमन दल शर्थीने आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे. आगीचं नेमकं कारण अजून अस्पष्ट (Fire Broke Out In Chemical Company) आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नवी मुंबईतील खेळणे एमआयडीसी परिसरात नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती. आगीची भीषणता जास्त होती. त्यामुळे शेजारी असणाऱ्या दोन कंपन्यांना देखील आगीने आपल्या भक्षस्थानी घेतलं (Badlapur Fire Accident) होतं. नवभारत केमिकल, क्लीनकेम लॅब आणि जास्मिन आर्ट अँड प्रिंट या तीन कंपन्यांना ही आग लागली होती.
अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझविण्यासाठी वेगात प्रयत्न सुरु होते. केमिकलवर फोमचा मारा करण्यात येत होता, तर इतर दोन कंपन्यांवर पाणी मारून आगीवर नियंत्रण (Fire Accident) मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. एमआयडीसीची अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचत नसल्यामुळे आगीची भीषणता वाढली, असा आरोप एका कर्मचाऱ्याने केला (Badlapur News) आहे. घटनास्थळी आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.