Mira Bhayandar News : उत्तनमधील कचरा डेपोला भीषण आग; चारचाकी वाहन जळून खाक

Mira Bhayandar Fire News : उत्तन परिसरातील कचऱ्याच्या डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग लागली असून एक चारचाकी वाहन चळून खाक झाल्याची माहिती आहे. दुपारी २ च्या सुमारास आग लागली आहे. गेल्या २-३ तासांपासून आग आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.
Mira Bhayandar News
Mira Bhayandar NewsSaam Digital

महेंद्र वानखेडे, मिरा भाईंदर

Mira Bhayandar News

उत्तन परिसरात असणाऱ्या डम्पिंग ग्राउंडला शनिवारी दुपारी ०२ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.मिरा भाईंदर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विजवण्याचे काम सुरू आहे.उत्तन येथील पालिकेच्या घनकचरा प्रकल्पतील साचलेल्या कचऱ्याला अनेक दिवसापासून सतत आग लागत असल्याची बाब समोर आली आहे.त्यामुळे खबरदारी म्हणून दोन अग्निशमन गाड्या घटना स्थळीच तैनात ठेवण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे.

भाईंदर पश्चिम येथील उत्तन परिसरात मिरा भाईंदर महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे.काही वर्षांपूर्वी या प्रकल्पात कचऱ्यावरील प्रक्रिया ठप्प झाली असल्यामुळे सुमारे १४ लाख मेट्रिक टन इतका कचऱ्याचा डोंगर त्या ठिकाणी उभा राहिला आहे.अश्या परिस्थितीत ९ फेब्रुवारी रोजी रात्री १० च्या सुमारास या कचऱ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली होती.त्यानंतर शनिवारी पुन्हा आग लागली.या आगीची माहिती मिळताच घटना स्थळी अग्निशमन विभाग दाखल झाले होते.मात्र सलग बचाव कार्य सुरु ठेवून सुद्धा आगीवर नियंत्रण मिळवणे पालिकेला अशक्य होत आहे.ही आग कचऱ्यामध्ये निर्माण होणाऱ्या मिथेन गॅस मुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Mira Bhayandar News
Sant Tukaram Beej 2024 : वर्सोव्यातील चौपाटीवर उभारली आयोध्या मंदिराची लक्षवेधी प्रतिकृती, हरिनाम सप्ताहात भक्त तल्लीन

वाहणाऱ्या वाऱ्यासोबत वाढत असून कोणत्याही क्षणी पुन्हा पेट घेत आहे.त्यानुसार शनिवारी या आगीने पुन्हा रौद्र रूप धारण केले आहे.आगीवर अद्याप नियंत्रण मिळवले गेलेले नाही.आग भीषण असून त्यात एक चारचाकी गाडी देखील जळल्याची घटना समजत आहे.आगीमुळे आजजुबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील लोक त्याला त्रस्त झाले आहेत. अग्निशामक दल घटनास्थळीं हजर झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याच्या घटना या अगोदर देखील अनेकदा घडल्या आहेत.

Mira Bhayandar News
Crime News: फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी; पोलिसांचं दुर्लक्ष होतंय का? पुणेकरांचा सवाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com