Hingoli Petrol Shortage Rules News Saam Tv
महाराष्ट्र

कॅन, बाटल्या, ड्रममध्ये पेट्रोल-डीझेल मिळणार नाही; पंपांवरील रांगांमुळं सरकारचा निर्णय

Petrol Shortage Rules News पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याच्या अफवांमुळे वाढलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. आता कॅन, बाटल्या आणि ड्रममध्ये इंधन देण्यास बंदी असून वाहनानुसार मर्यादित इंधनच मिळणार आहे.

Namdeo Kumbhar

petrol diesel limit rule Maharashtra latest : इंधनाचा तुटवडा झालाय, पेट्रोल-डिझेल महागणार, गॅस सिलिंडरनंतर आता काही दिवसांत पेट्रोल संपणार याची अफवा उडाली अन् राज्यात पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. वाढत्या गर्दीमुळे अनेक पंपावरील पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक संपलाय. हिंगोली, जालना, संभीजनगरसह राज्यातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलसाठी लोकांचा रांगा लागल्या आहेत. कॅन, बाटल्या, ड्रम घेऊन लोक पेट्रोल भरून ठेवत आहेत. त्यामुळेच आता सरकारकडून यावर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे कॅन, बॉटल्या, ड्रममध्ये पेट्रोल-डिझेल मिळणार नाहीच. त्याशिवाय फक्त कुणाला किती पेट्रोल मिळणार, याचीही माहिती दिली.

सोशल मीडियावरील अफवांमुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या रांगा लावून टाक्या फुल करून घेण्याचे प्रमाण वाढल्याने संभाजीनगरमध्ये जिल्हा प्रशासनाने नवा नियम काढला आहे. आता दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त रुपये २००/- पर्यंतच इंधन भरण्यात येणार आणि तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त रुपये २०००/- पर्यंतच पेट्रोल- डिझेल मिळणार आहे. असा आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढणयात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तरीही, समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेल्या अफवांमुळे नागरिकांकडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असून रांगा लागलेल्या आहेत. परिणामी मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झालेला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने व इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खालीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत.

काय आदेश काढण्यात आले वाचा

१. दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त रुपये २००/- पर्यंतच इंधन भरण्यात यावे.

२. तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त रुपये २०००/- पर्यंतच इंधन भरण्यात यावे.

३. कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या, ड्रम इत्यादीमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे.

४. नागरिकांनी अनावश्यक गर्दी व रांगा टाळून आवश्यकतेनुसार इंधन घ्यावे.

५. रुग्णवाहिका (Ambulance) व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्यात यावा.

६. प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोज आपल्या पंपावर उपलब्ध असलेला शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त झालेला साठा व मागणी केलेला साठा याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील.

७. सर्व पेट्रोल पंप धारकांनी सदर आदेशाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

८. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल. सदर आदेश हा तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येत असून, हा आदेश या कार्यालयाचे पुढील आदेशापावेतो लागू राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT