Ashok Kharat Case: कोणत्या सीड्या बाहेर काढायच्या हे भाजपनं ठरवलंय; बच्चू कडूंचा धक्कादायक खुलासा

Bachchu Kadu On Kharat Photo: अशोक खरात प्रकरणात बच्चू काडू यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. व्हायरल व्हिडिओ भाजपचे कार्यकर्ते करत असल्याचा दावा केला आहे. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय तणाव वाढला आहे.
Bachchu Kadu  On Kharat Photo:
Bachchu Kadu reacts to viral video controversy, makes explosive allegations in Kharat case.saam tv
Published On
Summary
  • बच्चू कडू यांनी भाजपवर गंभीर आरोप केले

  • ‘सीडी पॉलिटिक्स’चा मुद्दा उचलत राजकीय वाद वाढला

  • खरात प्रकरणामुळे अनेक नेते अडचणीत

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबत असल्याचे अनेक राजकीय नेत्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. खरात याच्यासोबत फोटो असल्यामुळे रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता बच्चू कडू यांचा अशोक खरातसोबत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना बच्चू कडू यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. भाजपचे लोकांच्या सीड्या बाहेर काढत आहे. कोणाच्या कधी सीडी बाहेर काढायची हे त्यांना चांगल माहितेय, असं बच्चू कडू म्हणालेत.

Bachchu Kadu  On Kharat Photo:
नाशिकच नव्हे, मुंबई, पुण्यातही प्रॉपर्टी; भोंदू बाबा खरातची संपत्ती किती अन् कुठे-कुठे?

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातील अनेक नेत्याचे धाबे दणादणले आहे. भविष्य वर्तवण्याची बतावणी करत खरातने शंभरहुन अधिक महिलांचं लैंगिक शोषण केले असून याप्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आहेत. अशोक खरातचं लैंगिक शोषणाच प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय नेत्यांचे धडधड वाढली आहे. खरात हा अनेक नेत्यांचा राजकीय मार्गदर्शक होता. त्याच्यासोबत अनेक नेत्यांचे फोटो व्हायरल झालेत.

Bachchu Kadu  On Kharat Photo:
Ashok Kharat: पतीला बाहेर बसवायचा आणि केबिनमध्ये गर्भवती महिलेसोबत...; खरातचा आणखी एक कारनामा आला समोर

दरम्यान खरात प्रकरण हे भाजपनेच बाहेर आणणल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होता. आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठा खुलासा केला आहे. हैवान अशोक खरात याच्यासोबत फोटो असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिवसेना, भाजप आणि ठाकरे गटाच्या नेत्यांचेही फोटो व्हायरल झाले. यानंतर आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात ते खरातचे पाया पडताना दिसत आहेत.

बच्चू कडू खरातच्या पाया का पडले ?

भोंदू बाबाचा आम्ही निषेध करतो, आम्हाला कार्यकर्त्यांनी महादेवाच्या मंदिरात नेलं, त्या ठिकाणी ते भोंदू बाबा होते, त्यांनी त्या ठिकाणी माझा सत्कार केला, ते माझ्यापेक्षा मोठी असल्याने संस्कृती प्रमाणे मी त्यांच्या पाया पडलो. आम्हाला माहित असते की, हा महाराज कामाचा नाही पण समाज मन जपण्यासाठी आम्ही जातो, मात्र आम्ही त्याचा निषेध करतो.

त्या महाराजांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही त्यांच्याकडे गेले होते. एकनाथ शिंदे, विखे- पाटील सुद्धा तिथे गेले पण तुम्ही मी त्यांना विचारलं का? त्या भोंदू बाबांनी जे सांगितलं त्यांचं पूर्ण निदान चुकीचं निघालं मी त्यावेळेस उद्धव ठाकरें यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो.

भाजप सीड्या बाहेर काढत आहे?

कोणत्या सीड्या बाहेर काढायच्या हे भाजपने ठरवले आहे. इतर लोक गेले पण त्यांना विचारलं नाही, पण बच्चू कडू गरीब आहे, म्हणून तुम्ही विचारत आहात. बच्चू कडूंना बदनाम करण्याचा अजेंठा भाजप कार्यालयाकडून चालवला जातोय. खरात सोबतची माझी भेट एक्सीडेंटली झाली. कार्यकर्त्यांसोबत मी गेलो, त्या ठिकाणी माझा सत्कार झाला ती माझी चूक नाही. पण ते व्हिडिओ काढून मला बदनाम करण्याचं काम भाजपची टीम करत आहे.

आसाराम बापूच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा गेले, भाजपचे मोठे चार नेते आसाराम बापू सोबत नसताना सुद्धा आहे, मग त्यांचा राजीनामा घ्यावा लागणार नाही का? ते झाकून ठेवायचं आणि इतर लोकांचा राजीनामा घ्यायचा, कोणासोबत कोणाचा फोटो असला म्हणजे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात टाकणं चुकीचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com