नाशिकच नव्हे, मुंबई, पुण्यातही प्रॉपर्टी; भोंदू बाबा खरातची संपत्ती किती अन् कुठे-कुठे?

Ashok Kharat Properties In Mumbai, Pune Nashik : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातने कोट्यवधींची संपत्ती जमवली आहे. नाशिकपासून अहिल्यानगर ते थेट परदेशातही त्याने आपली माया पूंजी जमवली आहे. याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या सभागृहात दिली.
Ashok Kharat Properties In Mumbai, Pune Nashik
CM Devendra Fadnavis reveals details of Ashok Kharat’s vast property empire in the Assembly.saam tv
Published On
Summary
  • अशोक खरातने कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा खुलासा

  • मुंबई, पुणे, नाशिक आणि परदेशात प्रॉपर्टी असल्याची माहिती

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात तपशील दिला.

भोंदूबाबा अशोक खरात यांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाने अख्खा महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. खरात याच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी अनेक महिला समोर येत आहेत. दररोज नवं-नवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. आतापर्यंत खरातविरुद्ध ५ गुन्हे दाखल करण्यात आलेत. दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. देवेंद्र फडणवीस आज सभागृहात निवेदन दिलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदू बाबाची संपत्तीची माहिती दिली.

Ashok Kharat Properties In Mumbai, Pune Nashik
Rupali Chakankar: अशोक खरात प्रकरण भोवलं! रुपाली चाकणकरांची उचलबांगडी होणार? सुनेत्रा पवार घेणार मोठा निर्णय

दरम्यान अशोक खरातची संपत्ती २०० नाही तर तब्बल २ हजार कोटींच्या घरात असल्याचं समोर आलं आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रॉपर्टीचा लेखाचिठ्ठा वाचला. आरोपीकडे केलेल्या चौकशीतून आणि प्राप्त माहितीवरून त्याची विविध ठिकाणी मालमत्ता असल्याचं समोर आले आहे.

Ashok Kharat Properties In Mumbai, Pune Nashik
'शुद्धीकरण तर कोणाला लग्नाचं आमिष'; अशोक खरात लैंगिक अत्याचारासाठी वापरायचा वेगवेगळ्या क्लृप्त्या; ५ वा गुन्हा दाखल

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे त्याची स्वतःच्या नावावर ३३ एकर जमीन आणि एक फार्महाऊस आहे. नाशिकमधीलच पाथर्डी आणि गवाणे गावात १० एकर जमीन, तर सिन्नरमध्ये ६ एकर जमीन आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे साडेचार एकर आणि शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे सव्वा पाच एकर जमीन त्याच्या नावावर आहे.

खरातची घरं कुठे- कुठे आहेत?

नाशिकच्या पाथर्डी फाट्यावर ८०० स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट,

ओझर येथे ४ गुंठ्याचे तीन प्लॉट,

आडगाव येथे ५ गुंठ्याचा प्लॉट आणि कर्मयोगी नगर येथे स्वतःचा बंगला आहे.

याशिवाय नवी मुंबईतील पनवेल येथे ४० गुंठ्यांचा प्लॉट

नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे १८० स्क्वेअर फुटाचे ऑफिस आहे. त्याने आपल्या मुलीच्या नावावर संगमनेर येथे ११ गुंठ्यांचा प्लॉट आणि पुण्यामध्येही एक प्लॉट खरेदी केला आहे.

Ashok Kharat Properties In Mumbai, Pune Nashik
'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

यासह शिर्डी येथे भागीदारीमध्ये 'साई सिल्वर ओक' नावाचे मंगल कार्यालय आहे. सिन्नरमध्ये पाच जणांच्या भागीदारीत ६ एकर जमीन आहे. दागिन्यांच्या स्वरूपात स्वतःकडे १२ तोळे आणि पत्नीकडे २० तोळे सोने आहे, तसेच पत्नीच्या नावे डीमॅट खात्यात १ ते २ लाखांची गुंतवणूक आहे. त्याची आयसीआयसीआय, युनियन, सारस्वत, विश्वास को-ऑपरेटिव्ह आणि एसबीआय अशा एकूण पाच बँकांमध्ये खाती आहेत. या सर्व मालमत्तेचे एकूण बाजार मूल्य ४० कोटी ८७ लाख रुपये इतके आहे.

तपासात असेही समोर आले आहे की खरातने अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, युएई, साऊथ आफ्रिका, इथोपिया, टांझानिया, केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, पेरू, युगांडा आणि कंबोडिया अशा अनेक देशांचा प्रवास केला आहे. या सर्व मालमत्तेबाबत आयजीआर आणि आयकर विभागाला पत्र पाठवण्यात आले असून, यापेक्षा जास्त मालमत्ता असण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने सखोल तपास सुरू असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com