Chhatrapati Sambhaji Nagar Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar: कंत्राटी कर्मचाऱ्यांनी क्रीडा संकुलाचे 21 कोटी रुपये हडपले, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. बँकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी क्रीडा संकुलाच्या खात्यातील 21 कोटी रुपये स्वतः च्या खात्यात वळते करुन घेतले आहेत.

Siddhi Hande

छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैंक खात्यातील 21 कोटी 59 लाख 38 हजार 287 रुपये दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या खात्यांत वळते करून हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीनंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar News)

याप्रकरणी आरोपींमध्ये हर्षकुमार क्षीरसागर, यशोदा शेट्टी व तिचा नवरा बी. के. जीवन यांचा समावेश आहे. क्रीडा अधिकारी तेजस कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार, क्रीडा संकुलासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँकेमध्ये खाते उघडण्यात आले होते.

या खात्यातील व्यवहार क्रीडा उपसंचालकांच्या सहीने धनादेशाद्वारे होतो. विभागीय क्रीडा संकुलात दिशा फॅसिलिटीज कंपनीमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांची फेब्रुवारी २०२२ मध्ये निवड केली होती. त्यात आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यांची निवड केली. त्यानंतर २०२३ मध्ये वेब मल्टिसर्व्हिसेसमार्फत क्षीरसागर व यशोदा शेट्टी यांची लेखा लिपिक म्हणून नियुक्ती झाली होती.

क्षीरसागरने हा घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांच्या नाव आणि स्वाक्षरीचा वापर करून बँकेस बनावट मजकुराचे पत्र पाठवून खात्याला स्वतःचा मोबाइल क्रमांक जोडला. मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बैंकिंग सुविधा सुरू करून घेत पैसे ट्रान्स्फर केले.

कंत्राटी कर्मचारी इतकी मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर करत असताना बँकेतील अधिकाऱ्यांना काहीच कसं कळलं नाही, असा प्रश्न आहे. आयकर विभागाच्या नोटिसाही आल्या नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

राधाकृष्ण विखेंची गाडी फोडल्यास १ लाखाचं बक्षीस! बच्चू कडूंचा संतापजनक इशारा

Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

Andheri Pedestrian Bridge: रेल्वेच्या पादचारी पुलावर महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी; मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT