Minister Chhagan Bhujbal Saam Tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: ओबीसी आरक्षणावर आक्रमण होत आहे...; व्हायरल ऑडिओ क्लिपवर छगन भुजबळांचं स्पष्टीकरण

Chhagan Bhujbal Audio Clip Viral: त्यामुळे करेंगे या मरेंगे, हेच सगळ्यांनी म्हटलं पाहिजे.", असं व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलंय.

Ruchika Jadhav

Chhagan Bhujbal News:

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे आमदार मंत्री छगन भुजबळ यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. व्हायरल क्लिपमधील आवाज भुजबळांचाच असल्याचं म्हटलं जातंय. रविवारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावर आता भुजबळांनी स्वत: आपली प्रतिक्रिया दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'आता ओबीसी काही वाचणार नाही.', असा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. त्यावरून बरेच राजकीय दावे प्रतिदावे झालेत. यावरून छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिलं आहे.

"राज्यात सर्वत्र ओबीसी आरक्षणावर आक्रमण होत आहे. बऱ्याच आमदारांची घरं पेटवली जातायत. ओबीसी कार्यकर्त्यांचं हॉटेलही पेटवलं जात आहे. त्यामुळे या घटनांवर कुणीतरी काही बोललं पाहिजे. फक्त एका व्यक्तीने नाही तर सर्वांनी एकत्र येऊन एका आवाजात बोललं पाहिजे, असा माझ्या बोलण्याचा अर्थ असल्याचं भुजबळांनी म्हटलं आहे.

जसं इतर लोक त्यांच्या समाजाला आवाहन करू शकतात, तसंच मी देखील ओबीसींमधल्या ३७५ जातींना आवाहन करू शकतो. आपण आपलं दु:ख एकजुटीने अन् एकमुखाने मांडले पाहिजे, असं भुजबळ म्हणालेत.

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?

"जी सगळी मंडळी येथे आली आहेत, त्यांचं एकच म्हणणं आहे की, आपण आवाज उठवायला पाहिजे. मी तर हे म्हणतच आहे की, आता आवाज उठवावा लागेल. गावागावात त्या लोकांचे बुलडोझर चालत आहेत. यामध्ये आता ओबीसी काही वाचणार नाहीत. त्यामुळे करेंगे या मरेंगे, हेच सगळ्यांनी म्हटलं पाहिजे.", असं भुजबळांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT