सचिन गाड
राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आलीये. राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीकडून तोतया ईडी अधिकाऱ्यांनी १५ कोटी रुपयांची खंडणी मागीतली आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अनिल भोसले यांना सोडवण्याच्या नावाखाली ही खंडणी मागण्यात आल्याची माहिती समोर आलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
खंडणीसाठी ईडीच्या बनावट लेटरहेडचा आणि ओळखपत्राचा वापर करण्यात आला होता. तसेच अनोळखी नंबरवरून अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा यांना खंडणीबाबत काही मॅसेजेस आले होते. शिवाजीराव भोसले बँक घोटाळाप्रकरणी अनिल भोसले सध्या अटकेत आहेत. वरळी पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले पुण्यातील शिवाजीराव भोसले बँक घोटाळाप्रकरणी ईडीच्या अटकेत आहेत. २५ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांना या प्रकरणी ईडीने ताब्यात घेतलंय. अनिल भोसलेंनी बँकेत चेअरमन आणि संचालक पदी कार्यरत असताना ७१ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय.
अनिल भोसले यांच्यावर काही दिवसांपासून ससून रुग्णालयात कैदी १६ वार्डमध्ये उपचार सुरू होते. मात्र ललित पाटील प्रकरणानंतर अनिल भोसले यांचीही येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यामुळेच रेश्मा भोसले गेल्या महिन्यात अजित पवार यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. मात्र अजित पवारांनी त्यांची भेट नाकारली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.