Chandrashekhar Bawankule Saam Tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule: माझी बायको पण कुणबी, माझ्या व्यंगावर बोलून...; जरांगेंच्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे भावुक

Chandrashekhar Bawankule On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्यंग आणि दिसण्यावरून टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना बावनकुळे भावुक झाले.

Priya More
  • चंद्रशेखर बावनकुळेंचे मनोज जरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर

  • माझी बायको पण कुणबी बावनकुळेंचे मोठे विधान

  • जरांगेंच्या टीकेवर उत्तर देताना बावनकुळे भावुक झाले

  • मराठा आरक्षणावरून बावनकुळे आणि जरांगे आमनेसामने

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्यंगावर त्यांनी विधान केले होते. मराठा आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप करत मनोज जरांगे हे बावनकुळे यांच्यावर सतत टीका करत आहेत. जरांगेंच्या या टीकाला आता बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. आज पत्रकार परिषद घेत जरांगेंना उत्तर देताना बावनकुळे भावुक झाले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, 'माझ्यावर टीका करून न्याय मिळत असेल तर त्यांनी खुशाल टिंगल टवाळी करावी.'

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, 'मला जरांगेंबद्दल काही बोलायचं नाही. वाईट वागायचं नाही. याचे उत्तर जनता शोधेल. सरकार म्हणून राज्य शांत ठेवणे आमची जबाबदारी आहे. ओबीसी- मराठासाठी सरकार काम करत आहे. मराठ्यांच्या ताटातील ओबीसी नाही ओबीसींच्या ताटातील मराठ्यांना द्यायचं नाही. आमचे फडणवीस सरकार दोन्ही समाजाला न्याय देणार आहे.'

व्यंगावर टीका करणाऱ्या जरांगेंना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, 'माझं व्यंगावर बोलून त्यांना टाळ्या मिळत असतील, त्यांना चांगला वाटत असेल. अजून काय हा त्यांचा स्वभाव असेल. त्यांना समाधान मिळत असेल तर त्यांना करू द्या. राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगलं ठेवणे सरकारची जबाबदारी आहे. दोन समाज समोरासमोर येऊ नये ही आमची जबाबदारी आहे. या सगळ्याचे कारण इतर जनता शोधेल. माझ्यावर टीका करून न्याय मिळत असेल तर त्यांनी खुशाल टिंगल टवाळी करावी. काय गैरसमज झाला आहे माहिती नाही.'

मी कधी जाती पात करत नाही. आम्ही महसूलकडून कुणबी जात प्रमाणपत्र दिला आहे. महसूल खात्याने एवढं काम केल्यावर जर व्यंग होत असेल तर याला काही अर्थ नाही. २२ लक्ष प्रमाणपत्रांमधील एक प्रमाणपत्र चुकीचा आला आहे. त्यावरही मी चौकशी लावली होती तेही क्लिअर झालं आहे. आताही कुणबी प्रमाणपत्र येत आहे ते रोज देत आहे. तरीही माझ्यावर व्यंग करून आनंद मिळत असेल तर त्यांनी आनंद व्यक्त करावा. माझे आणि जरांगेंचे बोलणे अनेकदा झाले आहे. पण एका प्रमाणपत्रामुळे गैरसमज झाले आहेत. व्हॅलिडीटी माझं काम नाही ते समाजकल्याण विभागाकडे आहे.'

तसंच, 'ओबीसी आंदोलकांना विनंती करतो कोणीही रस्त्यावरील आंदोलन करू नका. सरकार म्हणून विनंती करतो की, रस्त्यावर आंदोलन करू नका. यातून सामाजिक वाद होतील. कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असं काही करू नका. कायदेशीर लढा लढता येतो. ओबीसी समाजाने कोणताही वाद करू नये. मी कधी या वादात नाही, माझी पत्नी कुणबी आहे, आम्ही एकत्रित राहतो, सुनबाई मराठा आहे, आम्ही कुणबी, तेली, मराठा वाद करत नाही. आमचा पण परिवार आहे. माझ्या घरी बायको, मुलं, बहीण, माझं कुटुंब आहे. त्यांनाही याचा त्रास होतो. त्यांना जर माझ्यावर बोलून आनंद मिळत असेल तर मी त्याच्यावर काही बोलणार नाही.', हे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे भावुक झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागले होते.

चंद्रशेखर बावनकुळे मु्ख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, 'कास्ट व्हॅलिडीटी मध्ये काय झाला असेल तर मला माहिती नाही. सरकारी पक्ष लोकांनी व्यवस्थित वागले पाहिजे, माझ्या कुटुंबात पण सगळे आहेत. मी कुठल्याही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. मी केस चालवली तर राजकीय होईल, अप्पर प्रधान सचिवांकडे मुंडवा जमीन प्रकरण वर्ग केला आहे,जमीन सरकार जमा झाली आहे ते निर्णय घेतील. अजून एक बदली यादी आली आहे. ४० जणांची यादी आहे. घोटाळा आरोपींना या विभागात नोकरी करता येणार नाही. राज्यात मुंडवा जमीन घोटाळ्यासारखे घोटाळे होणार नाहीत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Gemini : हवी ती फ्रेम, हवा तो सीन आणि हवा तसा टकाटक व्हिडिओ...Gemini चं नवं फीचर करणार मार्केट जाम!

SIRमुळे महानगरांच्या मतदारांना झटका, 3 जिल्ह्यांमधील 84 लाख मतदार गायब

Nagpur Accident: उपचार घेऊन घरी परतत होते... वाटेतच काळाने गाठलं; पत्नीसमोरच 74 वर्षीय पतीचा हिट अँड रनमध्ये मृत्यू

जरांगेंना उपोषणासाठी लाल गोधडी का लागते? जरांगेंच्या लाल गोधडीचं गुपित काय?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत दाखल

SCROLL FOR NEXT