Akola : नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये १०३ पदांची भरती; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; कसा कराल अर्ज? वाचा

Akola News : अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये १०३ पदांची भरती जाहीर. कनिष्ठ लिपिक, वाहनचालक, शिपाईसह विविध पदांसाठी १७ डिसेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करा.
Akola Municipal Council Recruitment 2026
Akola Municipal Council Recruitment 2026AI Image
Published On: 

अकोला जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांच्या नगरपालिक प्रशासन शाखेमार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण १०३ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा, हिवरखेड, पातूर नगरपरिषद तसेच बार्शीटाकळी नगरपंचायत येथील रिक्त पदांचा या भरतीमध्ये समावेश आहे. यामध्ये कनिष्ठ लिपिक, लघु टंकलेखक, वाहनचालक, उद्यान पर्यवेक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, गाळणी चालक, जोडारी, विजतंत्री, पंप ऑपरेटर, तारतंत्री, वाहनचालक कम ऑपरेटर, अग्निशामक विमोचक, शिपाई आणि चौकीदार अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू राहणार आहे. पदानुसार वेतनश्रेणी वेगवेगळी असून, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण आणि इतर अटींची सविस्तर माहिती जाहिरातीच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

Akola Municipal Council Recruitment 2026
Bank Update : १ जानेवारीपासून ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा बंद होणार? काय आहे नेमकं सत्य? वाचा

या भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास तो ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांना २६ नोव्हेंबर २०२६ ते १७ डिसेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ डिसेंबर २०२६ आहे. याच कालावधीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

Akola Municipal Council Recruitment 2026
Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीही ४००० रुपयांनी महागली; वाचा आजचे दर

या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा (Computer Based Test) घेतली जाणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र आणि परीक्षेची तारीख अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भरतीसंदर्भातील सविस्तर जाहिरात, पात्रता आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अकोला जिल्ह्याच्या https://akola.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यामुळे जिल्ह्यातील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना या भरतीमुळे रोजगाराची संधी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.