Water Shortage : ठाणे महापालिकेचा भोंगळ कारभार! पाणी नसल्याने डायलिसिस थांबवले; ७ रुग्णांना उपचाराविनाच पाठवले घरी

Thane Municipal Corporation News : ठाणे महापालिकेच्या मुंब्रा येथील स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयात पाण्याअभावी सात रुग्णांचे डायलिसिस होऊ शकले नाही.
Thane Municipal Corporation News
Thane Municipal Corporation NewsSaam TV
Published On: 

विकास काटे, ठाणे प्रतिनिधी

Thane Hospital Water Shortage : हॉस्पिटलमध्ये पाणी नाही म्हणून डायलिसिस झाले नाही आणि पेशंट्सना तसेच घरी पाठवण्यात आले. ठाणे महापालिकेच्या मुंब्रा येथील स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.( Dialysis Treatment News)

हॉस्पिटलच्या स्वतंत्र जलवाहिनीवर अनधिकृत पाणी कनेक्शन घेतल्याने हॉस्पिटलमधील पाणीसाठा संपला आणि सात पेशंट्सचे डायलिसिस होऊ शकले नाही. या पेशंट्सना उपचार न करताच घरी पाठवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे हॉस्पिटलला टँकरनेसुद्धा पाणीपुरवठा होऊ शकला नाही; त्यामुळे सोमवारी संध्याकाळी पाणीसाठा संपला होता.

येथे पेशंट्सचे रोज तीन सत्रांत डायलिसिस केले जाते आणि प्रत्येक सत्रात ९०० लिटर पाणी लागते. रुग्णालयाला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीतून शुक्रवारपासून पाणी येत नव्हते. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडे टँकरची मागणी करण्यात आली; मात्र त्यांनीही टँकर देण्यास असमर्थता दर्शवली.

परिणामी, सोमवारी तिसऱ्या सत्रातील रुग्णांचे डायलिसिस पूर्ण करण्याएवढा पाण्याचा साठा रुग्णालयात उपलब्ध नव्हता. त्यामुळे तिसऱ्या सत्रातील सात रुग्णांचे डायलिसिस न करताच त्यांना घरी पाठवण्यात आले. आता मात्र अधिकाऱ्यांनी या प्रकरणी सारवासारव केली आहे.

Thane Municipal Corporation News
Smartphone Tips : रात्री ब्लँकेटमध्ये फोन चार्जिंगला लावताय? ३ चुका बॅटरीचा खेळ संपवतील

या वृत्तानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. महापौरांनी तातडीने या प्रकाराची दखल घेत हॉस्पिटलच्या पाणीपुरवठ्याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. पेशंट्सचे नियमित डायलिसिस असल्याने एक दिवस उशीर झाला तरी चालेल; पण अशा प्रकारे हॉस्पिटलमध्ये पाण्याअभावी उपचार लांबणार असतील, तर यंत्रणा नेमके काय करतेय, असा सवाल विचारला जातोय.

Thane Municipal Corporation News
Ladki Bahin Yojana : १,५०० रुपये खात्यात कधी जमा होणार? लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.