School Teachers: राज्यातील शिक्षकांचा मोठा निर्णय, 1 डिसेंबरपासून ऑनलाईन कामांवर टाकणार बहिष्कार

Teachers to Boycott Online Administrative: राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनी मोठा निर्णय घेतला. १ डिसेंबरपासून ते ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकणार आहेत.
School Teachers: राज्यातील शिक्षकांचा मोठा निर्णय, 1 डिसेंबरपासून ऑनलाईन कामांवर टाकणार बहिष्कार
Teachers to Boycott Online AdministrativeSaam Tv News
Published On: 

राज्यातील प्राथमिक शाळेचे शिक्षक ऑनलाइन आणि अशैक्षणिक कामांच्या वाढत्या ताणामुळे आक्रमक झाले आहेत. १ डिसेंबर २०२६ पासून ऑनलाइन प्रशासकीय कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे. यासोबतच प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडत शिक्षकांनी डिजिटल असहकार आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन कामांमुळे अध्यापनाचा वेळ कमी होत असल्याचा शिक्षक संघटनांनी आरोप केला आहे.

१ डिसेंबरपासून प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी असहकाराचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी ऑनलाइन कामांसह प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपलाही 'रामराम' ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा आणि रात्री-अपरात्री येणाऱ्या आदेशांमुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अध्यापनात अडथळा ठरणाऱ्या ऑनलाइन कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यांनी केल आहे. पुण्यातील शिक्षक भवन येथे पार पडलेल्या बैठकीत एकत्रित लढ्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्याचसोबत प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.

School Teachers: राज्यातील शिक्षकांचा मोठा निर्णय, 1 डिसेंबरपासून ऑनलाईन कामांवर टाकणार बहिष्कार
School Bus Fees : पालकांसाठी महत्त्वाची बातमी! १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी UPI द्वारे भरता येणार नाही? मोठी अपडेट समोर

राज्यातील ६४००० शाळांमध्ये शिकवणाऱ्या २ लाखांपेक्षा अधिक शिक्षकांनी हा निर्णय घेतला आहे. सततच्या अशैक्षणिक कामांना हे शिक्षक वैतागले आहेत. ऑनलाइन कामे आणि विविध मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कामांमुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे. मंगळवारी पुण्यातील शिक्षक भवन येथे राज्यातील विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत डिजिटल असहकार आंदोलनाचा निर्णय त्यांनी घेतला.

School Teachers: राज्यातील शिक्षकांचा मोठा निर्णय, 1 डिसेंबरपासून ऑनलाईन कामांवर टाकणार बहिष्कार
Maharashtra School Holiday: राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी कधीपासून आणि किती दिवस असणार? शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

प्रशासनाकडून व्हॉट्सअॅप ग्रुपवर रात्री रात्री-अपरात्री सूचना आणि आदेश पाठवले जातात. त्यामुळे शिक्षकांवरील मानसिक ताण प्रचंड वाढला आहे. याचा परिणाम अध्यापनावर होतो असा आरोप करत हाच मुद्दा या शिक्षक संघटनांनी लागून धरला आहे. स्विफ्ट चॅट, निपुण महाराष्ट्र, पीएम पोषण, उल्हास, गोट कर्मयोगी, विनोबा आणि स्वयं या सारखे ॲप्स शिक्षकांना वापरावे लागतात. या ॲप्सला शिक्षकांनी विरोध केला आहे. शिक्षकांना विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांसाठी या सर्व ॲप्सचा वापर करावा लागतो.

School Teachers: राज्यातील शिक्षकांचा मोठा निर्णय, 1 डिसेंबरपासून ऑनलाईन कामांवर टाकणार बहिष्कार
Pune School: पुण्यातील १० शाळांची मान्यता रद्द, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; विद्यार्थी अन् पालक चिंतेत

या सर्व ॲप्समध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक प्रगती, पोषण आहाराची माहिती आणि ऑनलाइन प्रशिक्षण यांसारख्या कामांचा समावेश आहे. या ॲप्सच्या कामासाठी शिक्षकांना बराच वेळ द्यावा लागतो. शिक्षकांनी स्पष्टपणे सांगितले की, शाळेच्या दैनंदिन कामकाजाशी थेट संबंधित ॲप्सचा वापर आमच्याकडून सुरूच राहणार आहे. पण विद्यार्थ्यांची उपस्थिती, मध्यान्ह भोजनाची माहिती आणि विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित डिजिटल कामे केली जातील. मात्र कामाचा अतिरिक्त बोजा वाढवणाऱ्या अनावश्यक ऑनलाइन उपक्रमांना आमचा विरोध कायम राहणार आहे.

School Teachers: राज्यातील शिक्षकांचा मोठा निर्णय, 1 डिसेंबरपासून ऑनलाईन कामांवर टाकणार बहिष्कार
School Admission Rules : शाळेच्या प्रवेशासाठी डोनेशन घ्याल तर याद राखा! नियम मोडणाऱ्या शाळांवर होणार कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.