Chandrapur News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News : अवैध दारू विक्रीच्या विरोधात महिला संतापल्या; विक्रेत्याच्या घरी धाड टाकत दारूची केली होळी

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील गेवरा बुजरूक या गावात हा प्रकार घडला आहे. दिवसांपासून अवैधरित्या दारूची विक्री सुरू आहे

संजय तुमराम

चंद्रपूर : गावात अवैधपणे दारूची विक्री होत आहे. या विरोधात अनेकदा आवाज उठविण्यात आले असून कारवाई होत नाही. यामुळे गावातील संतप्त महिलांनी या विरोधात आवाज उठवीत आक्रमक भूमिका घेऊन दारू विक्रेत्याच्या घरी धाड टाकली. येथे आढळून आलेली दारूला आग लावून नष्ट करण्याचे काम केले आहे. 

चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातील सावली तालुक्यातील गेवरा बुजरूक या गावात हा प्रकार घडला आहे. दिवसांपासून अवैधरित्या दारूची विक्री सुरू आहे. येथील महिलांनी अनेकदा या संदर्भातून पाथरी पोलिसांना (police) माहिती सुद्धा दिली .मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने महिलांनी स्वतःच पुढाकार घेत या विरोधात येथील स्थानिक महिलांनीच एल्गार पुकारलेला असून रात्री अवैध दारू विक्रेत्याच्या घरी धाड टाकून दारूच्या शेकडो बाटल्या गोळा केल्या.  

गेवरा बुजरूक या गावात अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर महिलांनी एकत्र येत दारू पकडली. महिलांनी गोळा केलेल्या सर्व दारूच्या बाटल्या गावातील चौकात आणून त्या दारूला आग लावली. तसेच यावेळी पोलीस प्रशासनाचा निषेध केला. रात्रीच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्याना चांगलाच चाप बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा वाटप

कंबरेला स्पर्श, किस करण्याचा प्रयत्न; दिवाळीच्या जत्रेत मुलीशी छेडछाड, घटनेचा Video Viral

Shehnaaz Gill: दिवाळी स्पेशल शहनाज गिलचा क्यूट व्हेल्व्हेट अनारकलीतील लूक, पाहा PHOTO

Blackheads: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स होतील गायब, स्कीन करेल ग्लो; फक्त करा 'या' सोप्या गोष्टी

Museum Robbery: दिवसाढवळ्या लूव्र संग्रहालयात दरोडा; नेपोलियन आणि जोसेफिनचे दागिने चोरीला

SCROLL FOR NEXT