Taloba Online Booking Scam Saam tv
महाराष्ट्र

Taloba Online Booking Scam : ताडोबा ऑनलाईन बुकिंग घोटाळा; १३ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त, काय आहे नेमका घोटाळा?

Chandrapur News : करारानुसार ऑनलाईन बुकिंगचा पर्यटकांचा पैसा ठाकूर यांच्या बँक खात्यात जमा होत होती. करारानुसार ताडोबातील जिप्सी, गाईड यांना नियमित पैसे द्यायचा होता. परंतु त्यांनी दिली नाही

संजय तुमराम

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन बुकींग घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्यातील आरोपी रोहीत विनोद ठाकूर आणि अभिषेक विनोद ठाकूर यांना सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) दणका दिला आहे. त्यांची नागपूर आणि चंद्रपूरातील तब्बल १३ कोटी ७१ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात स्थावर मालमत्ता आणि बॅंक खात्यातील रकमेचा समावेश आहे. 

वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशनचे संचालक रोहीत आणि अभिषेक ठाकूर आहेत. या कंपनीकडे चंद्रपुरातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी बुकिंग, प्रवेश शुल्क, जिप्सी शुल्क आणि मागदर्शक शुल्काची रक्कम गोळा करण्यासाठीची जबाबदारी होती. या करारानुसार ऑनलाईन बुकिंगचा पर्यटकांचा पैसा ठाकूर यांच्या बँक खात्यात जमा होत होती. करारानुसार ताडोबातील जिप्सी, गाईड यांना नियमित पैसे द्यायचा होता. परंतु त्यांनी दिली नाही. 

१६.५ कोटी रुपयांची अफरातफर 

दरम्यान सन २०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीत त्यांनी १६.५ कोटी रुपयांची अफरातफर केली. ताडोबा प्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक डॅा. जितेंद्र रामगावकर यांनी २०२३ मध्ये यासंदर्भात रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ८ एप्रिल २०२४ ला ठाकूर बंधूंना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांनी जामीन नाकारत दोन कोटी ४९ लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले. 

मालमत्ता केली जप्त 

दरम्यानच्या काळात डॅा. रामगावकर यांनी या घोटाळ्याची तक्रार सक्त वसूली संचालनालयाकडे केली होती. मात्र, तत्पूर्वीच ८ जानेवारी २०२५ ला सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्या चंद्रपुरातील प्रतिष्ठानवर छापा टाकला. त्यात १ कोटी ४२ लाख रुपयांचे सोने, चांदी, प्लॅटिनम आणि महत्वाची कागदपत्र जप्त केली. आता ईडीने १३.७१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

SCROLL FOR NEXT