मयुरेश कडव
बदलापूर : बदलापूरचे गणपती बाप्पा यंदा मार्च महिन्यातच परदेशवारीला रवाना झाले. चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून कॅलिफोर्नियाला गणेशमूर्तींचा पहिला कंटेनर रवाना झाला असून मे महिन्या अखेरपर्यंत तब्बल अडीच लाख गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या जाणार असल्याची माहिती चिंतामणी क्रिएशन्सचे निमेश जनवाड यांनी दिली आहे.
देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. त्यानुसार परदेशात देखील बाप्पाची स्थापना करून उत्सव साजरा करण्यात येतो. यासाठी भारतातून परदेशात गणेश मूर्तींची मागणी करण्यात येत असते. गणेशोत्सवाला पाच- सहा महिन्यांचा अवधी असताना आतापासूनच गणेश मूर्तीची परदेशात पाठवणी करण्यात येत आहे. त्यानुसार बदलापूरमधून पहिला कंटेनर रवाना झाला आहे.
मे महिन्याअखेरपर्यंत परदेशवारी
परदेशात असलेल्या भारतीयांनाही गणेशोत्सव साजरा करता यावा, बाप्पाचा पाहुणचार करता यावा, यासाठी बदलापूरचे तरुण उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन्सकडून दरवर्षी परदेशात गणेशमूर्ती पाठवल्या जातात. बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्याने अगदी ६ महिने आधीपासूनच गणपती बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात होते. यंदा सर्वात आधी कॅलिफोर्निया देशात गणपती बाप्पा रवाना झाले आहेत. मे महिन्याअखेरपर्यंत बाप्पांची ही परदेशवारी अखंडपणे सुरू राहील, ज्यात अडीच लाख गणपती बाप्पा आपल्या परदेशातल्या भक्तांकडे रवाना होतील.
वेगवेगळ्या देशात बाप्पाची रवानगी
गणेशोत्सवापूर्वी दरवर्षी कॅलिफोर्निया, कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, युरोप, जर्मनी, आखाती देश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा जगातल्या अनेक देशांमध्ये निमेश जनवाड हे गणेशमूर्ती पाठवत असतात. त्यामुळे परदेशात वास्तव्याला असलेले भारतीय तिकडे राहून आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.