World Forest Day : उजाड माळरानाचे केले नंदनवन; वनरक्षकाची १६ एकरात ३ हजार ७५० रोपाची लागवड

Nanded News : शिवसाम घोडके यांनी कंधार तालुक्यात पानभोसी येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात रोप लागवड चळवळीस सुरुवात केली. पानभोसी गावात नऊ महिन्यात २५० प्रजातीच्या ३ हजार ७५० रोपाची लागवड
World Forest Day
World Forest DaySaam tv
Published On

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: एखाद्या कामाला चळवळीचे स्वरूप लाभले आणि लोकसहभाग मिळाला की त्याचे महत्त्व अधोरेखित होण्यास वेळ लागत नाही. अशीच एक अधोरेखित करणारी कहानी आहे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पानभोसी गावातील वनरक्षक असलेल्या शिवसाम घोडके यांची. या व्यक्तीने ज्याने निसर्ग सेवा गटाची स्थापना करून दररोज एक रोप लागवड चळवळ सुरू केली. ती आजतागायत सुरूच आहे. 

वनरक्षक शिवसाम घोडके यांनी १ जानेवारी २०२२ पासून सुरू केलेल्या या चळवळीने एका उजाड माळरानाचे चक्क नंदनवन केले असून एका छोट्या जंगलाची निर्मिती केली आहे. शिवसाम घोडके यांनी कंधार तालुक्यात पानभोसी येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात रोप लागवड चळवळीस सुरुवात केली. पानभोसी गावात घोडके यांनी मागिल नऊ महिन्यात या परिसरात २५० प्रजातीच्या ३ हजार ७५० रोपाची लागवड केली आहे. 

World Forest Day
Pimpri Chinchwad Police : जप्त केलेला ६८४ किलो गांजा नष्ट; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

संपूर्ण जिल्ह्यात १६ हजार रोपांची लागवड 

मागील चार वर्षापासून घोडके यांनी ही चळवळ सुरूच ठेवली आहे. सुरुवातीच्या काळात पेशाने वनरक्षक असलेल्या घोडके यांच्या वृक्ष रोपण लागवडीकडे लोकांनी लक्ष दिले नाही. वनरक्षक असल्याने काहीतरी शासकीय काम ते करत असतील असा लोकांना गैरसमज होता. मात्र घोडके यांनी निस्वार्थपणे हे कार्य सुरूच ठेवले. घोडके यांच्या कार्याला नांदेड जिल्ह्यातून लोकांचा सहभाग हळूहळू वाढू लागला. याच लोकसहभागातून संपूर्ण जिल्ह्य़ात शिवसाम घोडके यांनी १६ हजार रोपांची लागवड केली आहे. 

World Forest Day
Raver Crime News : लिफ्ट देऊन अडकला हनी ट्रॅपमध्ये; ११ लाखांची खंडणी मागणारी महिला ताब्यात, रावेर तालुक्यातील घटनेने खळबळ

गावात जन्म, वाढदिवशी होते रोप लागवड  

विशेष म्हणजे कंधारचे असलेल्या घोडके यांनी आपल्या तालुक्यात मुलीच्या जन्माचे, वाढदिवस, लग्न, स्मृतिदिन एखाद्या कार्याची सुरुवात रोप लागवड तसेच रोप भेट देऊन करतात. तसेच पानभोसी गावात नवविवाहित वधू- वर अक्षता पडताच रोप लागवड करतात. या गावात मुलीच्या जन्माला वरदान समजले जाते. कुणाच्याही घरी मुलीचा जन्म झाला, तरी घोडके यांच्या माध्यमातून मुलीच्या नावे एक रोप लागवड केली जाते. या गावात मागिल चार वर्षापासून केक कापून वाढदिवस साजरा करणे ऐवजी परिसरात लोक रोप लागवड करून वाढदिवस साजरा करत असतात. 

घोडके यांच्या या कार्यास युवक युवतींचा देखील मोठा सहभाग दिसून येत आहे. पानभोसी येथील हा उपक्रम हळूहळू संपूर्ण जिल्ह्य़ात पोहोचला आहे. निसर्गसेवा गटातर्फे संपूर्ण जिल्ह्य़ात दररोज एक रोप लागवडीतून मागिल चार वर्षात १६ हजार रोप लागवड करण्यात आली आहेत. पुढील काळात देखील जास्तीत जास्त रोप लागवड करण्यात येणार असल्याच शिवसाम घोडके यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com