Raver Crime News : लिफ्ट देऊन अडकला हनी ट्रॅपमध्ये; ११ लाखांची खंडणी मागणारी महिला ताब्यात, रावेर तालुक्यातील घटनेने खळबळ

Jalgaon News : एका ४३ वर्षीय महिलेने लिफ्ट मागितली. गाडी खाली असल्याने इसमाने महिलेला लिफ्ट दिली. सोबत प्रवास केल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली. दरम्यान एकदा सदर इसमास महिलेने जेवणास बोलवले
Raver Crime News
Raver Crime NewsSaam tv
Published On

रावेर (जळगाव) : कारमध्ये महिलेला लिफ्ट दिल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मात्र या महिलेने इसमास हनी ट्रॅपमध्ये अडकवून अश्लिल व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागण्यात आली होती. साधारण ११ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेत महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

जळगावच्या रावेर तालुक्यात सदरची घटना २०१८ मध्ये घडली आहे. यात एकजण कारने ट्वेरहून जळगावला येत असताना चोपडा तालुक्यातील एका ४३ वर्षीय महिलेने लिफ्ट मागितली. गाडी खाली असल्याने इसमाने महिलेला लिफ्ट दिली. सोबत प्रवास केल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली. दरम्यान एकदा सदर इसमास महिलेने जेवणास बोलवले असता तिने कोल्ड्रीक्समध्ये गुंगीचे औषध टाकून त्यास बेशुद्ध करून त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याचा व्हिडीओ देखील तिने केला. 

Raver Crime News
Liquor Ban : दारू विक्रीचा व्हिडीओ काढा, बक्षीस मिळवा; ग्रामसभेत करण्यात आला ठराव

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मागितली खंडणी 

घडल्या प्रकरणानंतर सदरचा इसम अनभिन्न होता. याच दरम्यान सदरचा व्हीडीओ महिलेने इसमाच्या घरी व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार खंडणी मागू लागली. बदनामीला घाबरून इसमाने २३ डिसेंबर २०२३ पासून महिला व तिच्या मुलाच्या खात्यावर फोन पेद्वारे ११ लाख रुपये टाकले. तरी देखील या महिलेची पैशांची मागणी सुरूच ठेवली. यामुळे त्रस्त झालेल्या व्यक्तीने रावेर पोलिसात याबाबत तक्रार दिली. 

Raver Crime News
Pimpri Chinchwad Police : जप्त केलेला ६८४ किलो गांजा नष्ट; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

एक लाख रुपये स्वीकारताना घेतले ताब्यात 

प्राप्त तक्रारीवरून १९ मार्चला रावेरचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी महिलेला पकडण्यासाठी पथक पाठविले. तर रावेर- बऱ्हाणपूर मार्गावरील एका दुकानामागील बाजूस इसमास महिलेने बोलावले होते. याच वेळी पथकाने एक लाख रुपये स्वीकारताना महिलेस ताब्यात घेतले. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com