Kasara Ghat Accident : कसारा घाटात भीषण अपघात; चालकाचा ताबा सुटल्याने गाडी दरीत कोसळली, दोघांचा मृत्यू

Shahapur News : नवीन कसारा घाटातून सकाळी सात वाजेच्या सुमारास कसारा घाटतील ब्रेक फेल पॉईंट जवळ सिमेंटच्या ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. घाट रस्ता असल्याने ट्रक थेट दरीत कोसळला
Kasara Ghat Accident
Kasara Ghat AccidentSaam tv
Published On

फैय्याज शेख 
शहापूर
: नवीन कसारा घाटात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल पॉईंट जवळ ट्रक अनियंत्रित झाला. यामुळे थेट घाटाच्या दरीत कोसळली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान अपघातानंतर लागलीच आपत्ती व्यवस्थापनकडून मदत कार्य सुरु करण्यात आले होते. 

नाशिकहून मुंबईच्या दिशेने सिमेंट घेऊन निघालेला ट्रक नवीन कसारा घाटातून मार्गस्थ झाला होता. दरम्यात नवीन कसारा घाटातून सकाळी सात वाजेच्या सुमारास कसारा घाटतील ब्रेक फेल पॉईंट जवळ सिमेंटच्या ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. घाट रस्ता असल्याने ट्रक थेट दरीत कोसळला. दरीत या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता मदतकार्य लागलीच सुरु करण्यात आले. 

Kasara Ghat Accident
World Forest Day : उजाड माळरानाचे केले नंदनवन; वनरक्षकाची १६ एकरात ३ हजार ७५० रोपाची लागवड

मृत दोघे मालेगावचे 

दरम्यान दरीत ट्रक कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला असून हे मृत्यूदेह पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापनच्या सदस्य मदतीने दरीतून बाहेर काढले. यानंतर मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी कसारा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर सदर अपघातात मृत्यू झालेले दोघे जण मालेगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

Kasara Ghat Accident
Ganpati Idols Export : बदलापूरचे बाप्पा परदेशवारीला रवाना; कॅलिफोर्नियाया पहिला कंटेनर रवाना

सायन- पनवेल मार्गांवर कंटेनर पलटी

नवी मुंबई : सायन- पनवेल मार्गावर कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. कंटेनर पलटी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियम जवळ कंटेनर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडी झाल्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com