Chandrapur News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News : उमेदवाराची पार्टी बेतली जीवावर; रात्रीच्या अंधारात विहिरीत पडून माजी उपसरपंचाचा मृत्यू

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील फत्तेपूर इथे प्रमोद मगरे या काँग्रेसशी जुळलेल्या कार्यकर्त्याने आपल्या गिट्टी क्रशर परिसरात कार्यकर्त्यांसाठी रात्री भोजन आयोजित केले होते

संजय तुमराम

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते जात आहेत. या कार्यकर्त्यांसाठी रात्रीच्यावेळी जेवण अर्थात पार्टीचे नियोजन असते. त्यानुसार एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित एका पार्टीत गेलेल्या माजी उपसरपंचाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना उघड झाली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 

चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील फत्तेपूर इथे प्रमोद मगरे या काँग्रेसशी जुळलेल्या कार्यकर्त्याने आपल्या गिट्टी क्रशर परिसरात कार्यकर्त्यांसाठी रात्री भोजन आयोजित केले होते. यात जवळच्या पांझुर्णी येथील माजी उपसरपंच गजानन काळे हे सहभागी झाले. पार्टी सुरू असतानाच काळे एका सहकाऱ्यासह लगतच्या मोकळ्या जागेत गेले असता अंधारात ते तेथील विहिरीत पडले. आवाज येताच सगळे धावले. यात एकाला पोहता येत असल्याने तो वाचला. मात्र गजानन काळे हे विहिरीत बुडाल्याने त्यांचा (Death) मृत्यू झाला. 

अपघात कि घातपात? 

घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आज सकाळी मृतदेह बाहेर काढला. दुसरा दिवस उजाडला तरीही गुन्हा अद्याप दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिसांवर दबाव असल्याचे बोलले जात आहे. विहिरीत पडलेल्या व्यक्ती नशेत होता का? त्यांना कुणी धक्का दिला का, हा अपघात आहे की घातपात, अशा शंका आता उपस्थित केल्या जात आहेत. निवडणुकीचा माहोल असताना एका पक्षाच्या पार्टीत अशी घटना घडल्याने उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

SCROLL FOR NEXT