बीड : बजरंग सोनवणे हे भाजपला मॅनेज आहेत. खासदार सोनवणे यांनी मॅनेज होऊन केज मतदार संघासह जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघावर उमेदवार दिले आहेत. यामुळेच केजमध्ये शरद पवारांची सभा झाली नाही; असा गंभीर आरोप मनसेचे सुमंत धस यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ नेत्यांच्या प्रचार सभा होऊ लागल्या आहेत. या प्रचार सभांमधून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Beed News) बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यामुळे बीड जिल्ह्यात चर्चा रंगू लागल्या आहेत.
केजमध्ये मनसेचे इंजिन धावणारच
दरम्यान (MNS) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे केज मतदारसंघाचे उमेदवार रमेश गालफाडे यांचे चिन्ह असलेले इंजिन असून ते केज मतदारसंघातून धावणारच आहे. जनतेला वेड्यात काढायचे काम या दोघांनी केले. त्यामुळे येणाऱ्या काळात केज मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुलाल उधळेल; असा विश्वास देखील यावेळी मनसेचे उमेदवार रमेश गालफाडे यांच्यासह सुमंत धस यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.