Voter List Scam Saam tv
महाराष्ट्र

Voter List Scam : दोनच मतदार असताना एकाच घरात दाखवले ११९ मतदार; चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादीतील घोटाळा उघड

Chandrapur News : विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात एकाच घरातून ११९ मतदार दाखविल्याचा प्रकार उघडकीस आला आल्याने खळबळ उडाली आहे

संजय तुमराम

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत मतदार यादीमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस गावात देखील मतदार यादीतील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यामध्ये, एकाच घरात ११९ मतदारांची नोंद झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्या घरात प्रत्यक्षात केवळ दोन मतदार राहतात.

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. ही बाब गंभीर असून, यामुळे मतदार यादीतील अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मतदार यादीतील घोटाळा चंद्रपूर जिल्ह्यातही समोर आला आहे. घुग्गुस या गावात एकाच घरात ११९ मतदारांची नोंद सापडली आहे. मुळात या घरी केवळ दोन मतदार आहेत. असे असताना इतक्या मोठ्या संख्येने मतदार आले कोठून हा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. 

यादी तपासणीत समोर आला प्रकार 

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस हे ग्रामपंचायत असलेले औद्योगिक गाव आहे. या गावात सचिन बांदुरकर यांचे ३५० क्रमांकाचे घर आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत या घरातून तब्बल ११९ जणांची नोंदणी झाली आहे. या मतदारांचा घर क्रमांक हा ३५० आहे. एका लहानशा घरात एवढ्या मतदारांची नोंद कशी काय करण्यात आली, हा मोठा प्रश्न आहे. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या यादीनुसार तपासणी केली असता हा घोटाळा समोर आला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

घर मालकही अनभिन्न 

दरम्यान मतदार यादीत वाढविण्यात आलेले मतदार असलेले हे कोण लोक आहेत, त्यांची नोंदणी कुणी केली? तसेच नोंद कुणी केली असेल, त्यांच्या लक्षात हा प्रकार आला नाही का, की हे बोगस मतदार आहेत? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. ही माहिती समोर आल्यावर घर मालक देखील चकित झाले. तर काँग्रेसने या बोगस प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार जपून करावे; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

KDMC च्या प्रसुतीगृहात १ दिवसाच्या बाळाचा मृत्यू; डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी हलगर्जी केल्याचा आरोप

Maharashtra Live News Update: पुण्यात गणपती विसर्जनाला रेकॉर्ड, ३१ तासांपासून मिरवणूक सुरूच

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

MS Dhoni: कॅप्टन कूल चित्रपटात झळकणार? धोनी अन् आर. माधवनची दमदार अॅक्शन, टीझर रिलीज

SCROLL FOR NEXT