Risod Nagar Parishad : रिसोड प्रभाग रचनेची माहिती मुदतीच्या अगोदरच व्हायरल; माहिती बाहेर आल्याने खळबळ

washim Risod News : नगरपालिका व महापालिका नवीन प्रभाग रचना तयार करत आहे. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून गट- गणांची आखणी करण्यात येत आहे. यासाठी विशिष्ट अशी मुदत देण्यात आली आहे
Risod Nagar Parishad
Risod Nagar ParishadSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 

वाशीम : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या अनुषंगाने तयारी सुरु करण्यात आली आहे. नगरपालिका व महापालिका यांची नवीन प्रभाग समिती रचना आखण्यात येत आहे. हि माहिती गोपनीय ठेवली जात असते. मात्र वाशिमच्या रिसोड नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेची गोपनीय माहिती अधिकृत तारखेच्या आधीच बाहेर आली आहे. यामुळे खळबळ उडाली असून माहिती कोणी लीक केली याचा तपास सुरु आहे. 

राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निश्चित झाले आहे. साधारण दिवाळीनंतर या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार प्रशासकीय स्तरावर तयारी सुरु करण्यात आली आहे. नगरपालिका व महापालिका नवीन प्रभाग रचना तयार करत आहे. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून गट- गणांची आखणी करण्यात येत आहे. यासाठी विशिष्ट अशी मुदत देण्यात आली आहे. 

Risod Nagar Parishad
Solapur Rain : दक्षिण सोलापुरात पावसाचा हाहाकार; अनेक गावांना फटका, शेतात पाणीच पाणी

१८ ऑगस्ट होती मुदत 

दरम्यान वाशिमच्या रिसोड नागरपरिषदेकडून प्रभाग रचना आखण्यात आली. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची अधिकृत तारीख १८ ऑगस्ट देण्यात आली आहे. असे असताना वाशिम जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेली प्रत काही लोकांच्या हाती आल्याने खळबळ उडाली आहे. अर्थात दिलेल्या मुदतीच्या आत प्रारूप प्रभाग रचना व्हायरल झाल्याने रिसोड नगरपरिषदेत देखील खळबळ उडाली आहे. 

Risod Nagar Parishad
Accident News : कंटेनर चालकाचा अचानक यु टर्न; मोटारसायकल धडकली, एकाचा जागीच मृत्यू

नवीन प्रभाग रचना करण्याची मागणी 
तर आधीच प्रारूप प्रभाग रचनेवरून रिसोड शहरात राजकीय वातावरण तापले असताना आता या माहिती लिक झाली आहे. या प्रकरणामुळे संशयाची सुई संबंधित अधिकाऱ्यांकडे वळत आहे. तर या प्रकरणी रिसोड येथील इरफान कुरेशी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून या प्रकरणाची चौकशी करून पुन्हा प्रभाग रचना करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com