Chandrapur Congress Dispute 
महाराष्ट्र

Chandrapur Politics: काँग्रेस बुडाली, नेते मात्र हवेत; चंद्रपूर महापालिकेत गटनोंदणीत नवा ट्विस्ट

Chandrapur Congress Dispute : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची दाणादाण उडाली. त्यानंतर महापालिकेला काँग्रेसला फिनिक्स प्रमाणे झेप घेण्याची संधी असताना पक्षांतर्गत वाद थेट दिल्ली दरबारी पोचलाय. त्यामुळे भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस बुडत असताना नेते कशा पद्धतीने हवेत आहेत ? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

चंद्रपूरमध्ये काँग्रेस आणि आघाडीचे 30 नगरसेवक निवडून आले.

विजय वडेट्टीवार यांच्या गटातील 14 नगरसेवकांचं विजयी प्रमाणपत्र गहाळ

भाजपनं 34 चं संख्याबळ जुळवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत

काँग्रेस बुडाली. पण नेते मात्र हवेत आहेत.हे म्हणण्यामागे कारण आहे चंद्रपूर महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीबरोबरच काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे गट नोंदणीत निर्माण झालेला ट्विस्ट.कारण काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता प्रशासकीय नियमांच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. तर हाच धागा पकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट आयुक्तांवर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केलाय.

खरंतर चंद्रपूरमध्ये काँग्रेस आणि आघाडीचे 30 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे चंद्रपूर महापालिकेत सहज सत्ता स्थापन करण्याची संधी असतानाही काँग्रेसमध्ये अंतर्गत लाथाळ्या सुरू झाल्या. चंद्रपूरच्या गल्लीतला वाद थेट दिल्लीत गेला. आता चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील संघर्ष थेट हायकमांडच्या दारी गेलाय.

तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांच्या गटातील 14 नगरसेवकांचं विजयी प्रमाणपत्र गहाळ झाल्याचं समोर आलंय. त्यासंदर्भात तक्रारही देण्यात आलीय. दुसरीकडे हाच मुद्दा प्रशासकीय नियमाच्या कचाट्यात सापडल्यास त्याचा भाजप थेट फायदा उचलण्याची शक्यता आहे. काय आहेत.हे नियम..पाहूयात.

नव्या नियमानुसार फॉर्म क्रमांक तीन भरल्याशिवाय

नगरसेवकांना मतदानाचा अधिकार मिळत नाही…

काँग्रेसच्या नगरसेवकांची नोंदणी लटकवून मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय…

“विभागीय आयुक्तांचे अधिकार फक्त कागदपत्र तपासण्यापुरते आहेत.

दरम्यान काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा फायदा उठवण्यासाठी भाजप मैदानात उतरलंय.भाजपनं 34 चं संख्याबळ जुळवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.. तर काँग्रेसमधील संघर्ष पाहता ठाकरेसेनेचा कलही भाजपच्या दिशेनंच असल्याचं पहायला मिळतंय. चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तेसाठी 34 नगरसेवकांचं गणित जुळवावं लागणार आहे. त्यात आता ठाकरेसेनेचे 6 तर वंचितचे 2 अशा 8 नगरसेवकांना सोबत घेत भाजप सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु करत आहे.

हे असं असलं तरी दुसरीकडे काँग्रेसनं विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणीसाठी 2 वेगवेगळे अर्ज केल्यानं गुंता आणखीच वाढलाय.. त्यामुळे आता प्रशासकीय गुंता वाढत गेला तर त्याचा फायदा भाजप उठवल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळे काँग्रेस संपवायला काँग्रेसमधले नेतेच कारणीभूत असल्याचं समोर आलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP Election: माझा नाद नाही करायचा, थांब तुझी एन्क्वायरीच लावतो..., शिंदेंच्या आमदाराकडून भरसभेत बंडखोर उमेदवाराला धमकी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

अजितदादांच्या मृत्यूबद्दल वाढलं संशयाचं धुकं; छगन भुजबळ,पटेलांनीही सोडलं अपघातावर मौन

Phone slow tips: मोबाईल स्लो झाला असेल तर या सोप्या टीप्स वापरा

Success Story: गरिबीशी दोन हात करत 'तिने' करून दाखवलं; मोमोज विकणारी आता होणार डॉक्टर, वाचा

SCROLL FOR NEXT