Chandrapur BJP Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur Crime: नवजात बाळाच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश, भाजपच्या २ महिला नेत्यांना अटक

Chandrapur BJP: चंद्रपूरमध्ये दोन भाजपच्या महिला नेत्यांना पोलिसांनी अटक केली. या दोघींचा नवजात बाळाच्या विक्री रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले.

Priya More
  • चंद्रपूरमध्ये नवजात बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

  • भाजपच्या २ महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून अटक

  • बाळाच्या विक्री प्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक

  • पोलिसांकडून अधिक तपास सुरू

संजय तुमराम, चंद्रपूर

चंद्रपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या दोन महिला नेत्यांना पोलिसांनी अटक केली. या दोघी नवजात बाळाच्या विक्रीचे रॅकेट चालवत असल्याचे तपासातून उघड झाले. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या दोघींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पोलिस सध्या या दोघींची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पैशांच्या हव्यासापोटी नवजात बाळाचा सौदा करणाऱ्या प्रकरणात आता थेट राजकीय पक्षातील महिलांचा सहभाग दिसून आला आहे. याप्रकरणी भाजपाच्या दोन प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत‌. चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत तब्बल महिनाभरानंतर या रॅकेटचा पर्दाफाश केलाय.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटातील कार्यकर्त्या सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत केली आहे.‌ एका मातेने तिच्या अल्पवयीन लेकीच्या नवजात बाळाचा सौदा केला होता. या प्रकरणात पीडित मुलीवर अत्याचार करणारा नराधम प्रियकर अजय फुलझेले, त्या पीडित अल्पवयीन मुलीची आई आणि बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिलांना आधीच अटक करण्यात आली आहे.

या मानवी तस्करीच्या मोठ्या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा हात आहे. याचा तपास सुरू असतानाच या भाजपच्या दोन महिला कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून आला. त्यामुळे या दोघींना पोलिसांकडून तात्काळ अटक करण्यात आली. राजकारणात उजळ माथ्याने वावरणाऱ्या या दोन महिलांचे कारनामे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस आता याप्रकरणी पुन्हा कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : उत्तराखंडमध्ये बसून मुंबईच्या तरुणांची फसवणूक, नोकरीच्या नावाखाली कोट्यवधी उकळले; ११ जण अटकेत

Monsoon Spice Storage Tips: पावसाळ्यात मसाले खराब होतात? वापरा या ५ सोप्या ट्रिक्स, मसाले राहतील एकदम ताजे

Pune Traffic: संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गात मोठा बदल, पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर

Maharashtra Live Update: अमरावतीत MPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आक्रमक

Kalyan Rain: कल्याण-भिवंडीत पावसाचा हाहाकार, विजेचा धक्का लागून २ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT