Crime News : भावोजीच्या प्रेमात आकंठ बुडाली विवाहित मेहुणी; स्वतःच्याच बहिणीच्या हत्येचा रचला कट, पण स्वतःच गमावला जीव

madhya pradesh woman dies after alleged affair and murder plot under probe : बहिणीच्या नवऱ्यासोबत अफेअर. विवाहित मेहुणीनेच आपल्या स्वतःच्या बहिणाच्या हत्येचा कट रचला. पण या अनैतिक संबंधांचे बिंग फुटले अन् विपरित घडलं.
Rain Alert in maharashtra
Rain Alert in maharashtrasaam tv
Published On

अनैतिक संबंधांचा शेवट अत्यंत वाईट होतो याचा प्रत्येय मध्य प्रदेशच्या छतरपूरमधील घटनेनं आला. मेहुण्याच्या प्रेमात त्याची विवाहित मेहुणी आकंठ बुडाली होती. मेहुण्याने त्याच्या पत्नीचा आणि विवाहित मेहुणीने तिच्या नवऱ्याच्या हत्येचाही कट रचला. पण त्यांच्या या अनैतिक संबंधांचे बिंग फुटले. जिच्या हत्येचा कट रचला गेला, तिने या दोघांच्या अनैतिक संबंधांबाबत माहेरी सांगितले. त्यानंतर मेहुण्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मेहुणीने स्वतःला संपवले. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

राजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाय गावात ही घटना घडली. मेहुणा आणि मेहुणीने एकमेकांशी केलेल्या चॅटिंगमुळे त्यांचे बिंग फुटले. धक्कादायक बाब म्हणजे मेहुणीने मेहुण्याच्या मदतीने स्वतःच्याच बहिणीच्या हत्येचा कट रचला होता.

लग्नानंतर ५२ दिवसांनी आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर अवघ्या ५२ दिवसांनी नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. २६ जून रोजी या महिलेचा मृतदेह घरातील किचनमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. तिचं लग्न ५ मे रोजी झालं होतं. तिने आत्महत्या केली असा सुरुवातीच्या तपासातून दिसून येत होते. मात्र, सासरच्या मंडळींनी तिच्या मोबाइलमधील चॅटिंग तपासून बघितली असता, सगळ्यांचा पायाखालची जमीनच सरकली.

लग्नाआधीच मेहुण्यासोबत अफेअर

या महिलेचे लग्नाच्या आधीपासूनच बहिणीचा नवरा म्हणजेच मेहुण्यासोबत अनैतिक संबंध होते. तिच्या मोबाइलमधील चॅटिंगवरून या दोघांनी आपापल्या जोडीदारांची हत्या करण्याचा कट रचला होता. त्यावर दोघांमध्ये चॅटिंगमध्ये चर्चाही सुरू होती. या प्रेमप्रकरणाबाबत तिच्या माहेरच्यांना कळले होते. यावरून माहेरच्या मंडळींनी तिला खडसावलेही होते. त्यानंतर तिने आत्महत्या केली, अशी माहिती मिळत आहे. या प्रकरणाची नोंद पोलिसांनी केली असून, सखोल चौकशी सुरू आहे.

Rain Alert in maharashtra
Crime News: आजारी पत्नीला औषधाऐवजी पाजलं विष; पाच महिन्यांनंतर उलगडलं हत्येचं गूढ, पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दुसरीकडे मृत महिलेच्या सासरच्या मंडळींना वेगळीच चिंता सतावत आहे. या प्रकरणावरून आम्हाला हुंडाबळी प्रकरणात अडकवले जाऊ शकते, अशी भीती त्यांना आहे. शवविच्छेदन अहवाल, डिजिटल साक्ष आणि कुटुंबीय, नातेवाइकांच्या जबाबांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, अद्याप यात कोणतीही अटक झालेली नाही.

Rain Alert in maharashtra
Nashik Crime: बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या, खोलीचा दरवाजा उघडताच घरचे हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com