Nashik Crime: बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या, खोलीचा दरवाजा उघडताच घरचे हादरले

Nashik Crime: नाशिकमध्ये २७ वर्षीय तरुणाने बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं.
Nashik Crime: बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या, खोलीचा दरवाजा उघडताच घरचे हादरले
Nashik CrimeSaam Tv
Published On
  • नाशिकच्या मालेगावमध्ये २७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

  • बायकोकडून होणाऱ्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

  • बायकोसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल

  • सासू-सासरे यांना अटक तर दोन आरोपी फरार

अजय सोनवणे, मनमाड

नाशिकमध्ये बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. बायकोकडून वारंवार होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाने हे पाऊल उचललं. नाशिकच्या मालेगाव येथील कॅम्प भागातील साने गुरुजीनगरात ही घटना घडली. अनिकेत बाळासाहेब जगताप (वय २७ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

अनिकेतच्या आत्महत्या प्रकरणी नाशिकच्या कॅम्प पोलिसांनी तपास करत पत्नीसह सासू-सासरे आणि मामेसासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अनिकेत जगतापचे वर्षभरापूर्वी पंचशील नगरातील श्रुती जगताप (वय २२ वर्षे) या तरुणीसोबत लग्न झाले होते. मात्र, लग्न झाल्यापासूनच दोघांमध्ये सतत वाद होत होते. श्रुती ही नांदायला येत नव्हती तसेच तिने अनिकेतविरुद्ध पोलिसात तक्रार केल्याने तो गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होता.

Nashik Crime: बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या, खोलीचा दरवाजा उघडताच घरचे हादरले
Beed Crime: बीड हादरले! सासुरवाडीत जावयाची हत्या, धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं

बायकोच्या सततच्या त्रासाल कंटाळून अखेर अनिकेतने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी अनिकेतचा मानसिक छळ केल्याप्रकरणी बायको श्रुती जगताप, सासू वंदना सुभाष धिवरे, सासरे सुभाष सुकदेव धिवरे आणि मामेसासू उज्वला सतीश पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Nashik Crime: बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या, खोलीचा दरवाजा उघडताच घरचे हादरले
Delhi Crime: दिल्ली हादरली! १० वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह जंगलात नेऊन फेकला

या प्रकरणी सासू आणि सासरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अनिकेतची बायको श्रुती आणि मामेसासू उज्वला पवार हे फरार झाले आहे. श्रुतीला आणि मामेसासूला तत्काळ अटक करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा मयत अनिकेच्या कुटुंबीयांनी दिला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज निकम पुढील तपास करीत आहेत.अनिकेतच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Nashik Crime: बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या, खोलीचा दरवाजा उघडताच घरचे हादरले
Nagpur Crime: नागपूर हादरले! कौटुंबिक वाद टोकाला गेला, तिघांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com