गर्लफ्रेंडकडून धर्मांतराची अट... अन् प्रियकराची आत्महत्या; मेसेजमधून उघडकीस आलं प्रकरण

Sangli Youth EndLife Conversion Pressure Case: सांगलीतील १९ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी धर्मांतराची अट घातल्याचा आरोप. इंस्टाग्राम चॅटमधून उघड झाले धक्कादायक तपशील; पोलिसांनी तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल करून सायबर तपास सुरू केला आहे.
Police investigate Sangli suicide case after Instagram chats reveal alleged conversion pressure linked to a relationship.
Police investigate Sangli suicide case after Instagram chats reveal alleged conversion pressure linked to a relationship.saam tv
Published On

विजय पाटील, साम टीव्ही

सांगली शहरातील खणभाग परिसरात दुर्वांक प्रमोद शेवाळे (वय १९) या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नासाठी धर्मांतराची अट घातल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला असून, संबंधित तरुणीसह आणखी एका तरुणावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत दुर्वांकच्या मोबाईलमधील इंस्टाग्रामवरील विविध अकाउंटवरील चॅट्समधून काही महत्त्वाची माहिती समोर आल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सांगली शहर पोलिसांनी दोघांच्या सोशल मीडियाचा डेटा सायबर पोलिसांकडून मागविला असून, तपास सुरू आहे.

Police investigate Sangli suicide case after Instagram chats reveal alleged conversion pressure linked to a relationship.
ऑपरेशन तुडवाला सुरुवात; 6 खासदारांच्या फोटोला हाणले जोडे, मोदी-शाहांविरोधातही घोषणाबाजी

दुर्वांक शेवाळे हा पुण्यात नोकरी करत होता. त्याच्या घराजवळ राहणाऱ्या एका वृद्ध महिलेकडे कोल्हापूरची एक तरुणी येत असे. त्यातून दोघांची ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संबंधित तरुणीने लग्नासाठी तिचा धर्म स्वीकारण्याची अट घातल्याचा आरोप दुर्वांकच्या आई-वडिलांनी केला आहे. यासंदर्भातील इंस्टाग्राम चॅटचे पुरावेही त्यांच्या निदर्शनास आले.

Police investigate Sangli suicide case after Instagram chats reveal alleged conversion pressure linked to a relationship.
Monsoon Update: शेतकऱ्यांची चिंता वाढली! पुढील ५ दिवस पाऊस नाही, हवामान खात्याने दिला महत्वाचा सल्ला

या अटीमुळे दुर्वांक गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी दुर्वांकच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तरुणी व तिला मदत करणाऱ्या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police investigate Sangli suicide case after Instagram chats reveal alleged conversion pressure linked to a relationship.
Auto - Taxi driver : ..तर अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांवर कारवाई होणार, परिवहन विभागाचा अल्टिमेटम

दरम्यान, या प्रकरणातील अधिक तपासासाठी पोलिसांनी संबंधितांच्या सोशल मीडिया खात्यांची माहिती सायबर विभागाकडून मागविली असून, ती मिळाल्यानंतर तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com