CBSE Result 2026 Saam Tv
महाराष्ट्र

CBSE Result 2026: दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट, या दिवशी लागण्याची शक्यता

CBSE 10th-12th Result Date 2026: १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीबीएसई बोर्डाचा निकाल एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात लागू शकतो.

Siddhi Hande

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार?

CBSE बोर्डाचा निकाल या दिवशी लागण्याची शक्यता

विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट समोर

दहावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई बोर्डाचा निकाल कधी लागणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ११ मार्च रोजी संपली आहे. त्यानंतर आता महिना होऊन गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

CBSE बोर्डाचा निकाल या दिवशी लागणार (CBSE 10th-12th Result Announced on These Date)

रिपोर्टनुसार, सीबीएसई बोर्डाचा निकाल लवकरच लागणार आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच महिन्यात कधीही निकाल लागू शकतो. मागील अनेक वर्षांच्या ट्रेंडनुसार १०वीचा निकाल एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. दरम्यान, सीबीएसई बोर्डाचा १२वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. या वर्षी दोन टर्ममध्ये परीक्षा झाल्याने निकाल वेगवेगळ्या तारखेला लागण्याची शक्यता आहे.

सीबीएसई बोर्डाचा निकाल या वेबसाइटवर करा चेक (CBSE Result Websites)

cbse.nic.in

results.cbse.nic.in

cbseresults.nic.in

DigiLocker

UMANG अॅप

अशा पद्धतीने चेक करा निकाल (How to Check 10th-12th Result)

सर्वात आधी results.cbse.nic.in या वेबसाइटवर जा.

यानंतर Class X 2026 Results किंवा Class XII 2026 Results लिंकवर क्लिक करा.

यानंतर रोल नंबर, स्कूल नंबर, जन्मतारीख, अॅडमिट कार्ड नंबर टाकायचे आहे.

यानंतर तुम्हाला स्क्रिनवर रिझल्ट दिसणार आहे.

तुम्ही मार्कशीट डाउनलोड करुन प्रिंट आउट काढू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cleaning Hacks : तुम्ही देखील कपडे धुताना जास्त डिटर्जंट वापरताय? ही चूक ठरू शकते धोकादायक

भाजपचे नवनियुक्त मंत्र्याचे निधन! पक्षाचा अनुभवी चेहरा हरपला; राजकीय वर्तुळात हळहळ

Maharashtra News Live Update:जळगाव महापालिकेची निवडणुकीनंतरची पहिलीच स्थायी समितीची सभा पार

Kanda Papad Chutney: ५ मिनिटांत घरच्या घरी तयार करा पापडाची चटपटीत चटणी, कुरेकुरे-चिप्सला विसराल

Brain health tips: विसर पडणं आणि लक्ष न लागणं वाढलंय? मेंदूचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी करा हे उपाय

SCROLL FOR NEXT