bus accident at gondia kohmara highway 12 passengers injured two serious Saam Digital
महाराष्ट्र

Gondia Accident : गोंदिया- कोहमारा मार्गावर बसला अपघात, 12 प्रवासी जखमी, 2 गंभीर

bus accident at gondia kohmara highway: या अपघातामधील गंभीर जखमींना गाेंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा अधिक तपास पाेलिस करीत आहेत.

Siddharth Latkar

- शुभम देशमूख

गोंदिया ते कोहमारा महामार्गावर आज (साेमवार) पहाटेच्या सुमारास खाजगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 ते 12 प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या अपघाताबाबत पाेलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार गोंदिया ते कोहमारा महामार्गावरुन कोहमारा कडून गोंदियाकडे जाता बसला अपघात झाला. या बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने राईस मिलच्या सुरक्षा भिंतीला बस आदळली.

या घटनेत चालक व समोर बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. याबराेबरच बसमधील इतरही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या घटनेत सुमारे 10 ते 12 प्रवासी जखमी झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: २९ ऑगस्टला मनोज जरांगेंचे निर्णायक आंदोलन, फडणवीस सरकारपुढे ठेवल्या १० मागण्या?

Ladki Bahin Yojana : "आम्हाला लाभ नको!" जळगावातील हजारो महिलांचा 'लाडकी बहीण' योजनेला नकार, कारणही सांगितले

Tea and cholesterol: सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका?

Maharashtra News Live Update: आंदोलक विद्यार्थ्यांवर देशाला गर्व आहे - राहुल गांधी

Monsoon Fever : डेंग्यू, मलेरिया नाही; पावसाळ्यात वारंवार ताप येणे असू शकते 'या' गंभीर आजाराचे लक्षण

SCROLL FOR NEXT