Buldhana News Saamtv
महाराष्ट्र

Buldhana News: नऊ महिन्यांपासून डीपी बंद, महावितरण दखल घेईना, अखेर सरपंच थेट टॉवरवर चढले अन्..

Buldhana Latest News: खासदार प्रतापराव जाधव यांच्या तालुक्यातील ग्रामस्थांना आंदोलन करावे लागत असल्याने जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होत आहे

Gangappa Pujari

संजय जाधव, प्रतिनिधी

Buldhana Breaking News:

मेहेकर तालुक्यातील बाभुळखेड गावातील डीपी व सडलेले पोल बदलण्याची मागणी ग्रामस्थ करत होते. यासाठी विद्युत वितरण कार्यालयाच्या वारंवार चकरा मारूनही काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर संतप्त झालेल्या बाभुळखेड येथील सरपंच शिवशंकर गायकवाड यांनी चक्क विद्युत वितरण कंपनी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या टॉवरवर चढून "शोले" स्टाईल आंदोलन सुरु केले.

बाभुळखेड येथील विद्युत डीपी गेल्या ९ महिन्यांपासून नादुरुस्त असून गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच गावातील काही विद्युत पोलची अत्यंत दुरावस्था झाली आहे. अनेक पोल पूर्णपणे सडले आहेत व पोलच्या तारा खाली लोंबकाळत आहेत. यामुळे अपघात होऊन जिवितहानी होण्याचाही धोका निर्माण झाला.

म्हणूनच हे पोल बदलून नविन पोल बसवावे व नविन डीपी बसवीण्याची मागणी वारंवार उपविभागीय अभियंत्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर सरपंच गायकवाड व गावकऱ्यांनी विद्युत वितरण कार्यालयात अनेक चकरा मारल्या. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेवटी गावचे सरपंच शिवशंकर गायकवाड यांनी महावितरण कार्यालयाच्या पाठीमागील टॉवरवर चढून आंदोलन सुरु केले. या शोले स्टाईल आंदोलनामुळे महावितरण कार्यालयात एकच तारांबळ उडाली. अखेर उपविभागीय अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्या नंतर सरपंच खाली उतरले व आंदोलन मागे घेण्यात आले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT