Viral Video: विद्यार्थ्यांचं भविष्य वाऱ्यावर! गुरुजी झिंगाट होऊन वर्गातच झोपले, पालकांनी घडवली जन्माची अद्दल.. VIDEO
Uttar Pradesh Viral Video:
विद्यार्थ्यांच्या अंधारमय आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पाडून त्यांना क्षितिजापल्याड झेप घेण्यासाठी प्रोत्साहित करणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक. मात्र मुलांचे भविष्य घडवणारे, त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षकच चुकीच्या मार्गावर गेले तर? उत्तरप्रदेशमधून अशीच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. ज्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. (Viral Video News In Marathi)
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हमीरपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षक चक्क दारूच्या शाळेत पोहोचल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेत येऊन या गुरूजांनी थेट वर्गात झोपही काढली. शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी झोपलेल्या शिक्षकाला उठवण्याचा प्रयत्न केला.
मात्र तो इतका नशेत होता की उठलाच नाही. या शिक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शिक्षक शाळेत खुर्चीवर बसून दारूच्या नशेत डुलत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला निलंबित केले आहे.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक दारुच्या नशेत शाळेत झोपल्याची माहिती त्यांना मिळाली होती. शाळेत पोहोचलेल्या काही पालकांनी शिक्षकाला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही. तेव्हा लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवला आणि व्हायरल केला. हा शिक्षक याआधीही अनेकदा दारूच्या नशेत शाळेत आला होता, त्याला समजही देण्यात आली होती.
मात्र त्याच्यात काहीही सुधारणा झाली नाही, त्यामुळेच त्याचा व्हिडिओ काढून सर्वत्र व्हायरल करण्यात आला, असेही गावकऱ्यांनी सांगितले आहे. या व्हिडिओ प्रकरणाची प्रशासनानेही गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत असून शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. असे शिक्षक असतील तर विद्यार्थ्यांचे भविष्य कठीण आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. तर काही जणांनी या शिक्षकावर नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.