Buldhana Doctor Saam tv
महाराष्ट्र

Buldhana: ड्युटीच विसरले, २ डॉक्टरांसह १४ आरोग्य कर्मचारी सस्पेंड; बुलडाण्यात खळबळ

Buldhana Doctor: बुलडाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधत मोठी कारवाई करण्यात आली आहे. कामावर गैरहरज राहणाऱ्या २ डॉक्टरांसह १४ आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Priya More

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यामध्ये कर्तव्यावर कसूर केल्याप्रकरणी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. २ डॉक्टरांसह १४ आरोग्य कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी शिक्षण विभागानंतर आता आरोग्य विभागावर कारवाई केली आहे. यामुळे बुलडाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शासनाकडून रुग्णसेवेसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात हलगर्जी करणाऱ्या आणि कर्तव्यातील दिरंगाईसोबतच असुविधांचा कळस गाठणाऱ्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रामधील २ आरोग्य अधिकाऱ्यांसह १४ कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी एकाच वेळी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

यापूर्वी १० पटसंख्येच्या आत असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील ३५ शिक्षकांना गुलाबराव खरात यांनी निलंबित केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. आता आरोग्य विभागावर कारवाई करत गुलाबराव खरात यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली असून जिल्हाभर याची चर्चा होत आहे. गुलाबराव खरात यांनी अचानक जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिली. त्यावेळी डॉक्टरांचे गैरहजर आणि अनेक सुविधांचा अभाव यामुळे ही कारवाई करण्यात आली.

निलंबित करण्यात आलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची माहिती -

- डॉ विशाल सुरुशे (वैद्यकीय अधिकारी) प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव माळी आणि एक कर्मचारी.

- डॉक्टर विवेक थिगळे (वैद्यकीय अधिकारी), सागर जाधव (फार्मासिस्ट), अर्चना राऊत (स्वास्थ्य अभ्यागता) कोमल राठोड (आरोग्य सेविका) संगीता देशमुख (आशा वर्कर ) प्राथमिक आरोग्य केंद्र बोराखेडी.

- क्षितिज पवार (कनिष्ठ सहाय्यक), सुरज खरात (परिचर) प्राथमिक आरोग्य केंद्र उदयनगर

- प्रियंका इंगळे (आरोग्य सेविका), दिपाली सोनवणे, गीता बर्वे, सुजाता गायकवाड, ज्योत्स्ना खोले (आशा वर्कर) पिंपरी गवळी, प्राथमिक आरोग्य केंद्र.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT