Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

Buldhana News : पाणी शेतात घुसल्याने शेतीच प्रचंड नुकसान झालं असून, शेती खरडून गेल्याने उभं पीक सुद्धा वाहून गेलंय. पीक नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली
Buldhana Heavy Rain
Buldhana Heavy RainSaam tv
Published On

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातल्या घाटावरील तालुक्यात तसेच सिंदखेडराजा परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे परिसरातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर नदीला पूर आल्याने नदी काठावरील अनेक शेतकऱ्यांची शेती पिकांसह खरडून गेली. तसेच अनेक गावात पावसाचे पाणी शिरल्याने घरांचे देखील नुकसान झाले आहे.  

मागील दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी हाहाकार माजविला आहे. पावसाची प्रतीक्षा संपली असून मुसळधार आलेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. इतकेच नाही तर पावसामुळे नदी- नाल्याना पूर आल्याने पाणी गावांमध्ये देखील घुसले आहे. 

Buldhana Heavy Rain
Manoj Jarange Patil : फडणवीस मराठा नेत्यांना संपविण्याच्या तयारीत, भाजप आमदार- खासदारांचे फोन; मनोज जरांगे पाटील यांचा धक्कादायक दावा

सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टी

बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात मागील चार दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस झाला असून सिंदखेड राजा तालुक्यातील पाचही मंडळात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. तर देऊळगाव राजा तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेताला तलावाचे स्वरूप आले असून शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. यामध्ये कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग सह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

Buldhana Heavy Rain
Fraud Case : पाचोऱ्यातील दांपत्याचा अजब कारनामा; उपमुख्यमंत्र्याचा पीए असल्याचे सांगत १८ जणांची फसवणूक

आडोळ मध्यम सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरला
वाशीम : गेल्या तीन दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसाचा फटका मालेगाव तालुक्यातील खंडाळा परिसराला शेतकऱ्यांना बसण्याची भीती निर्माण झाली आहे. खंडाळा येथील आडोळ मध्यम सिंचन प्रकल्प सततच्या पावसामुळे शंभर टक्के भरला आहे. सांडव्यातून मागील दहा- बारा दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी, गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे विसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रकल्पाजवळील आणि अडाण नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता वाढली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com