Buldhana MLA Sanjay Gaikwad : उबाठाच्या बापात दम नाही, एकनाथ शिंदेंच्या आमदाराची आधी जीभ घसरली, मग म्हणाले...

Maharashtra Politics : बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या ‘उबाठ्याचा बापही माझी कॉपी करू शकत नाही’ या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, विरोधकांनी जोरदार टीका केली. अखेर गायकवाड यांनी स्पष्टीकरण देत यु-टर्न घेतला.
Buldhana MLA Sanjay Gaikwad : उबाठाच्या बापात दम नाही, एकनाथ शिंदेंच्या आमदाराची आधी जीभ घसरली, मग म्हणाले...
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On
Summary
  • ‘उबाठ्याचा बापही माझी कॉपी करू शकत नाही’ या वक्तव्यामुळे गायकवाडांवर विरोधकांचा हल्ला

  • वाढत्या दबावामुळे आज गायकवाडांचा यु-टर्न आणि स्पष्टीकरण

  • यापूर्वी आमदार निवासातील मारहाणीच्या प्रकरणामुळेही गायकवाड चर्चेत

  • शिंदे गटाच्या प्रतिमेला धक्का बसल्याची राजकीय चर्चा

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काल महायुती सरकारमधील वादग्रस्त आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाने राज्यभर ‘जनआक्रोश आंदोलन’ केले. या आंदोलनादरम्यान मुंबईसह अनेक ठिकाणी पथनाट्य, घोषणाबाजी आणि नाट्यमय आंदोलने करण्यात आली. त्यामध्ये काही दिवसांपूर्वी गायकवाड यांनी केलेल्या कृत्याचं पथनाट्यात रूपांतर करून सादरीकरण करण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड यांनी ‘माझी कॉपी कोणीही करू शकत नाही. मी ओरिजनल आहे, इतकंच काय तर उबाठ्याचा बापही माझी कॉपी करू शकत नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

हे वक्तव्य सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात जोरदार व्हायरल झाले. विरोधकांनी गायकवाड यांच्यावर टीकास्त्र सोडले. खासदार विनायक राऊत यांनी तर थेट टीका करत म्हटले की, "गायकवाड यांची भाषा ही महाराष्ट्राच्या राजकारणातील घाणेरडी संस्कृती दाखवते. अशा लोकांच्या वक्तव्यामुळे जनतेत राजकारणाबद्दलची घृणा वाढते. महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांचा ‘बाप’ दाखवून देईल." शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितले, "त्यांची कॉपी करणं हे कोणत्याही सज्जन आणि कर्तबगार माणसाचं काम नाही. अशा शब्दांचा वापर करून लोकशाहीतील चर्चेची पातळी खालावली जाते."

Buldhana MLA Sanjay Gaikwad : उबाठाच्या बापात दम नाही, एकनाथ शिंदेंच्या आमदाराची आधी जीभ घसरली, मग म्हणाले...
Sanjay Gaikwad: संजय गायकवाडांच्या प्रश्नावर भुजबळांनी हातच जोडले...VIDEO

वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे आणि वाढत्या दबावामुळे आज संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण देत यु-टर्न घेतला. त्यांनी सांगितले, "मी तसे बोललो नाही. तुम्ही माझ्या शब्दाचा विपर्यास केला आहे. मी उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांविषयी बोललो होतो. बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे दैवत आहेत, ते सर्वांचेच बाप आहेत. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे."

Buldhana MLA Sanjay Gaikwad : उबाठाच्या बापात दम नाही, एकनाथ शिंदेंच्या आमदाराची आधी जीभ घसरली, मग म्हणाले...
Sanjay Gaikwad : कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणं भोवलं, संजय गायकवाडांना दणका; अखेर पोलिसांत गुन्हा, VIDEO

राजकीय पातळीवर विरोधी गटाला टार्गेट करताना शब्दांचा अतिवापर आणि वैयक्तिक टीका करण्याची प्रवृत्ती महाराष्ट्रात नवी नाही. गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत प्रतिमा आणि प्रतिष्ठेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या संवाद मेळाव्यादरम्यान छापण्यात आलेल्या बॅनरवर पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि पक्षाचे चिन्ह नसल्याने आमदार संजय गायकवाड पक्षावर नाराज असल्याचं म्हटलं जात होतं.

Buldhana MLA Sanjay Gaikwad : उबाठाच्या बापात दम नाही, एकनाथ शिंदेंच्या आमदाराची आधी जीभ घसरली, मग म्हणाले...
Sanjay Gaikwad: डाळ-भातासाठी राडा घालणारे आमदार संजय गायकवाड कोण आहेत?

कोणत्या कृतीने संजय गायकवाड चर्चेत आले ?

शिवसेना आमदार संजय गायकवाड हे काही दिवसांपूर्वी आमदार निवासात वास्तव्यास होते. यावेळेस त्यांनी आमदार निवासातील कॅन्टीन मधून जेवण मागवले होते. हे जेवण खराब निघाल्याचा आरोप करत संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर कलम ३५२ अपमानित करणे, ११५(२) , मारहाण करणे , ३(५), संगनमत करून मारणे या कलमांतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणानंतर संजय गायकवाड यांना विरोधकांनी चांगलेच घेरले होते. तसेच यामुळेच गायकवाड जास्त चर्चेत आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com