Shivani Kalemkar arrives at the police station alive, exposing a major investigation lapse by Buldhana police. saam tv
महाराष्ट्र

पोलिसांनी जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भावाला जेलमध्ये डांबलं, नंतर तरुणी घरी परताच प्रशासन हादरलं

Woman Declared Dead Found Alive In Maharashtra Case: बुलढाणा पोलिसांचा धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला आहे. मृत घोषित केलेली महिला जिवंत समोर आल्यानंतर वडील आणि भावाला चुकीने जेलमध्ये टाकल्याचा प्रकार उघडकीस आला.

Omkar Sonawane

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा पोलिसांचा निष्काळजीपणाचा एक अजब नमुना समोर आला आहे. 20 दिवसापूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहापासून काही फुटावर महिलेचा शिरही होतं. याप्रकरणी तात्काळ माहिती मिळाल्यावर जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि फॉरेन्सिक विभागाची टीम बोलावून या सर्व प्रकरणाचा तपास केला. विशेष म्हणजे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी या प्रकरणात मार्गदर्शन करून या प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा केला होता.

मध्य प्रदेशातील एका गावातील शिवानी बापूराव कळमेकर असे या मृत मुलीचं नाव असून तिचे तिच्या प्रियकराशी अनैतिक संबंध असून ती विवाहित देखील होती. प्रियकराची ओढ असल्याने तिच्या वडिलांनी आणि भावाने तिची हत्या करून मृतदेह महाराष्ट्रातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा धरणाजवळ आणून टाकला होता अशी उकल जळगाव जामोद पोलिसांनी केली होती. याप्रकरणी आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप ठेवत बुलढाणा पोलिसांनी शिवानी कळमेकरचे वडील बापूराव कळमेकर आणि भाऊ यांना अटक करून बुलढाणा कारागृह दाबून ठेवला आहे. अजूनही ते बुलढाणा कारागृहात आहेत. मात्र शिवानी कळमेकर जिवंत असून तिने आज तिच्या प्रियकरासोबत आज बुऱ्हानपूर पोलीस स्टेशन गाठत थेट मी जिवंत असून माझ्या हत्याच्या गुन्ह्यात माझ्या वडिलांना भावाला जळगावजामोद पोलिसांनी जेलमध्ये ठेवलं असल्याचा कबुली जबाब दिला आहे.

काही वेळापूर्वीच शिवानी कळमेकर ही जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहेत. मात्र बुलढाणा पोलिसांनी आढळलेल्या मृतदेहाचा डीएनए तपासणी न करता शिवानी कळमेकरच्या वडिल आणि भावावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकले आहे. त्यामुळे या प्रकरणात बुलढाणा आणि जळगाव जामोद पोलिसांचा मोठा निष्काळजीपणा समोर येत आहे.मात्र ज्या महिलेचा मृतदेह सापडला होता ती नेमकी कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे. बुलढाणा पोलीस या घटनेबद्दल बोलायला सध्या तरी तयार नाहीत.

याबाबत लढाणा पोलिसांची सारवासारव करत स्पष्टीकरण देताना पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले की, आरोपीनी पोलिसांची दिशाभूल केली होती. संबंधित महिला अनोळखी असल्याने तिचे डीएनए फोरन्सिक तपासणीसाठी (FSL) ला पाठवण्यात आले होते. पुण्यातून मिळालेल्या माहितीनुसारच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच आरोपीना अटक करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली. दरम्यान संबंधित महिला जिवंत असल्याची माहिती आज खगणार पोलिसांकडून मिळाली असून ती जळगाव जमोद पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे. सध्या तिचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केसगळती कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल हर्बल हेअर ऑइल, कधी आणि कसं लावायचं? जाणून घ्या

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! MACP योजनेचे नियम बदलले; 'या' कर्मचाऱ्यांना आता एक रुपयाही मिळणार नाही

Heart Attack : BP नॉर्मल असतानाही येतो हार्ट अटॅक, 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष करणे पडते महागात

Farmers Protest : मुगाला १०० टक्के हमीभाव, हजारो शेतकरी आक्रमक; ७ दिवसांचं अन्न-पाणी घेऊन ठिय्या, शाळांना सुट्टी

Belly fat: पोटाच्या कोणत्या भागावर चरबी साचतेय? तज्ज्ञांनी सांगितलं कोणत्या गंभीर आजारांचा असू शकतो हा मोठा इशारा

SCROLL FOR NEXT