Manasvi Choudhary
लांब, मोठे, सरळ केस असावेत अशी सर्वच महिलांची इच्छा असते. मात्र आजकाल खराब जीवनशैली, प्रदूषण यामुळे केस खराब होतात.
केमिकलयुक्त प्रोडक्ट्सपेक्षा तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने केसांसाठी जेल शॅम्पू बनवा.
जेल शॅम्पू बनवण्यासाठी अॅप्पल विनेगर, कोरफड जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे साहित्य एकत्र करा.
एका भांड्यामध्ये अॅपल व्हिनेगर, कोरफड आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा.
नंतर हे मिश्रण केसांना मुळापासून लावा आणि हलक्या हातांनी केसांची मसाज करा. साधारण ३० ते ४० मिनिटे झाल्यानंतर केसांना कोमट पाण्याने धुवा.
आठवड्यातून एकदा या पद्धतीने केस धुतल्यास टाळू स्वच्छ राहतो. केस चमकदार राहतात. या घरगुती शॅम्पून केसांची वाढ होते केस लांब होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.