Shegaon News Saam tv
महाराष्ट्र

Shegaon News: शेगाव तालुक्यातील जानोरी गावाचा पाणी प्रश्न पेटला; गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव

Buldhana News : संतप्त गावकऱ्यांनी दोन दिवसांआधी सायंकाळी सरपंच अर्चना ढोले यांच्या निवासस्थानासमोर घेराव घालून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती

Rajesh Sonwane

संजय जाधव 
बुलढाणा
: शेगाव तालुक्यातील जानोरी गावात पाण्याची टंचाई भेळसावत आहे. यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या (Buldhana) पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे गावातील पाणी प्रश्न पेटला असून संतप्त ग्रामस्थांनी अगोदर सरपंच निवासस्थानासमोर घेराव घालून जाब विचारला. त्यानंतर आपला मोर्चा (Shegaon) शेगाव पंचायत समितीकडे वडवून तेथे गटविकास अधिकाऱ्यांना घेरावं घालत जाब विचारला. (Latest Marathi News)

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जानोरी गावात गेल्या महिना- दीड महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र वणवण भटकावे लागत आहे. त्यातच शेतीचा हंगाम सुरू असल्याने लोकांना शेतातील कामे सोडून पाणी भरण्यासाठी दिवस गमवावा लागत आहे. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी दोन दिवसांआधी सायंकाळी सरपंच अर्चना ढोले यांच्या निवासस्थानासमोर घेराव घालून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तीव्र आंदोलनाचा दिला इशारा  

जानोरी गावातील नागरिकांना सध्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्याचे दिसून येत नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थ शेगाव पंचायत समिती कार्यालयावर धडकले. येथे गटविकास अधिकारीस घेराव घातला. तसेच प्रशासनास पाणीप्रश्न सोडविण्याबाबत आदेशित करावे; अन्यथा नाइलाजास्तव आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा देत जानोरी येथील गावकऱ्यांनी शेगाव पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी सतीश देशमुख यांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नगर पालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकीत रायगडमध्ये महायुती तुटण्याचे खा. तटकरे यांचे संकेत

मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाट्टेल ते... चांदीच्या वाट्या वाटल्या, VIDEO

RailOne अ‍ॅपवरुन रेल्वेचं तिकीट बुक करा अन् ३ टक्के डिस्काउंट मिळवा; आजपासून सुविधा सुरु

Famous Singer Death : लोकप्रिय गायकाचं निधन, 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रचाराच्या तोफा थंडावल्या असतानाच भाजपमधून ७६ बड्या नेत्यांची हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT