Buldhana News : सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांची निदर्शने

दरम्यान मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
Buldhana Farmers Protest At Mahavitran Office
Buldhana Farmers Protest At Mahavitran Officesaam tv
Published On

Buldhana News : पंधरा दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झालेत. संतप्त शेतक-यांनी महावितरण कार्यालयासमाेर निदर्शने केली. यावेळी शेतक-यांनी सुरळीत विद्युत पूरवठ्याची मागणी केली. (Maharashtra News)

Buldhana Farmers Protest At Mahavitran Office
Anganwadi Sevika Andolan : दिवाळीपूर्वी भाऊबीज द्या; नंदुरबार जिल्हा परिषेदवर अंगणवाडी सेविकांचा ठिय्या

बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील वीज वितरण उपकेंद्र अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतातील गेल्या पंधरा दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची रब्बी पिके सुकू लागली आहेत.

महावितरणच्या (mahavitran) कारभाराविरोधात रोष व्यक्त करत शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय गाठून जोरदार निदर्शने केली. संबंधित डीपीवरील अतिरिक्त विद्युत भार कमी करून वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतक-यांकडून करण्यात आली. दरम्यान मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Buldhana Farmers Protest At Mahavitran Office
Maratha Aarakshan : मनाेज जरांगे पाटलांना धमकविणा-या नितेश राणेंची मराठा समाजाने दखल घ्यावी : खासदार विनायक राऊत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com