Sanjay Gaikwad On Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : एकनाथ शिंदेच खरे हिरे, आमचे मंत्री सुद्धा लखलख करतात; 'त्या' टीकेला संजय गायकवाड यांचं उत्तर

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला शिंदे गटातील बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही

Sanjay Gaikwad On Uddhav Thackeray : हिऱ्यांची किंमत किंवा हिऱ्यांची पारख बाजारात गेल्यावरच कळते. मुख्यमंत्र्यांच्या रूपाने आज आमचा हिरा लखलख करतोय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कपाळावर बाळासाहेबांचा हिऱ्याचा मुकुट शोभतो का? असं म्हणत शिंदे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ते बुलडाण्यात बोलत होते. (Maharashtra Political News)

आज शिवसेना भवनात बोलताना, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला होता. 'बरं झाले गद्दार गेले, त्यामुळे हिरे सापडले, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. (Latest Marathi News)

बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली ती भाजपची पालखी वाहण्यासाठी नाही. हिंदुत्वाची पालखी वाहण्यासाठी केली आहे, अशी टीका देखील  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी शिंदे गटावर केली होती.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला शिंदे गटातील बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. 'हिऱ्यांची किंमत किंवा हिऱ्यांची पारख बाजारात गेल्यावरच कळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या रूपाने आज आमचा हिरा लखलख करतोय, मंत्री सुद्धा लख लख करताहेत, असं गायकवाड म्हणाले.

पुढे बोलताना, संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले, हिऱ्याची किंमत आज राज्याला कळली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कपाळावर बाळासाहेबांचा हिऱ्याचा मुकुट शोभतो का? हा प्रश्न सगळ्यांनी केला पाहिजे. उगाच त्यात आमचा हिरा चिपकवून त्यांची किंमत कमी करणे, हा उद्देश असू शकतो. असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT