Uddhav Thackeray : बरं झाले गद्दार गेले, त्यांच्यामुळे 'हिरे' सापडले; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला, पाहा VIDEO

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Uddhav Thackeray vs Eknath ShindeSaam TV
Published On

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. 'बरं झाले गद्दार गेले, त्यामुळे हिरे सापडले, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. नाशिकमधील भाजपा नेते अद्वय हिरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेना भवनात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.  (Maharashtra Political News)

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Prakash Ambedkar On Sanjay Raut: संजय राऊत कोण? मी ओळखत नाही, प्रकाश आंबेडकरांची तिखट प्रतिक्रिया

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

'बरं झाले गद्दार गेले, त्यामुळे हिरे सापडले, हिरेंनी सांगितलेला भाजपचा त्रास २५ ते ३० वर्ष आम्ही भोगला आहे. आम्ही त्यांना पालखीत बसून फिरवले. मात्र, बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली ती भाजपची पालखी वाहण्यासाठी नाही. हिंदुत्वाची पालखी वाहण्यासाठी केली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

'लोकसभेत मविआच्या ३४ जागा निवडून येतील'

पुढे बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, आम्ही लोक निवडणुकांची वाट पाहत आहेत. महिन्याभरात मालेगावात सभा घेऊ. आज जो सर्वे प्रसिद्ध झाला त्यात आज निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडील ३४ जागा मिळणार असल्याचा अंदाज लावण्यात आला. मात्र सर्व एकत्र लढलो तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४० जागा मिळतील, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Satyajeet Tambe: मोठी बातमी! भाजपने डाव टाकला, नाशिकमध्ये सत्यजित तांबेंना पाठिंबा

नाशिकचे अद्वय हिरे ठाकरे गटात

उद्धव ठाकरे यांनी नाशकात भाजपला (BJP) मोठा धक्का दिला. भाजपचे अद्वय हिरे यांनी ठाकरे यांनी आपल्या गटात सामील करून घेतलं. हिरे यांच्या प्रवेशामुळे नाशकात ठाकरे गटाची ताकद वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अद्वय हिरे यांनी शिंदे गटाचे दादा भुसे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com