Prakash Ambedkar On Sanjay Raut: संजय राऊत कोण? मी ओळखत नाही, प्रकाश आंबेडकरांची तिखट प्रतिक्रिया

कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
Sanjay Raut vs Prakash Ambedkar
Sanjay Raut vs Prakash AmbedkarSaam TV

कैलास चौधरी, साम टिव्ही

उस्मानाबाद : कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या मुख्य स्तंभाबाबत बोलताना जबाबदारीने बोलावं, अशी सूचना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी हा टोला लगावला आहे. (Maharashtra Political News)

Sanjay Raut vs Prakash Ambedkar
MSRTC Employees : एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; संप काळात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना मिळणार नोकरी

काही दिवसांपूर्वीच राज्याच्या राजकारणात नवीन युतीची सुरूवात झाली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या युतीची घोषणा केली. मात्र, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि शरद पवार यांचे वैर सर्वश्रुत आहे.

महाविकास आघाडीमध्ये वंचितचा निभाव लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना शरद पवार हे भाजपाचेच असल्याचं मत व्यक्त केलं होतं. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंबेडकरांना चांगलंच धारेवर धरलं होतं. प्रकाश आंबेडकर यांनी जरा जपून बोलावं, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला होता.  (Latest Marathi News)

Sanjay Raut vs Prakash Ambedkar
Prakash Ambedkar News: ....तर आम्ही भाजपसोबतही बसू; प्रकाश आंबेडकरांचं राऊतांना स्पष्ट प्रत्युत्तर

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर आज शिक्षक मतदार संघ प्रचाराच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उस्मानाबाद मध्ये आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही.

महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत यापूर्वीच आपलं शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणं झाल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत आपण चर्चेला तयार आहोत, असं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com