Fake Voters Caught In Buldhana Saam tv
महाराष्ट्र

Buldhana: मतदानाच्या दिवशी राडा, ३ बोगस मतदारांना पकडलं; २ गाड्या भरून लोकांना आणलं; काँग्रेसचा आरोप

Fake Voters Caught In Buldhana: बुलढाण्यातील अनेक ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आतापर्यंत ३ ठिकाणी बोगस मतदारांना पकडण्यात आले. २ गाड्या भरून लोकांना मतदानासाठी आणल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Priya More

Summary -

  • बुलढाण्यात मतदानादिवशी तीन बोगस मतदारांना पकडण्यात आले

  • काँग्रेसने दोन गाड्यांनी बाहेरून मतदार आणल्याचा आरोप केला

  • गांधी प्राथमिक शाळा आणि तांत्रिक विद्यालय येथे गोंधळ झाला

संजय जाधव, बुलढाणा

बुलढाणा नगरपालिका निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बुलढाण्यात ३ बोगस मतदारांना पकडले गेले आहेत. बुलढाण्यात बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या तरुणाला पकडण्यात आले. या तरुणाला मतदान प्रतिनिधींनी चांगलाच चोप दिला. तर काँग्रेसने घाटाखालून २ गाड्या भरून बोगस मतदार आणल्याचा आरोप केला आहे.

बुलढाण्यात बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या तरुणाला पकडण्यात आले. या तरुणाला पळवून लावण्यात आले. यामुळे शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला होता. तर बुलढाण्यातील प्रभाग क्रमांक १५ साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे. याठिकाणी दोन बोगस मतदारांना पकडण्यात आले. वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी ता. मोताळा येथील एका व्यक्तीने मतदान केल्यानंतर पकडण्यात आले.

त्याच्यासोबत याठिकाणी आणखी एक जण बोगस मतदान करण्यासाठी आला आहे. कोथळी, इब्राहिमपूर येथून अन्य काही जण बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत. दरम्यान घाटा खालून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले आहेत. या गंभीर बाबीची दखल पोलिस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी काँग्रेस, पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

बुलढाण्यात अनेक मतदान केंद्रावर ग्रामीण भागातून बोगस मतदार आणून त्यांच्याकडून मतदान करून घेत असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार दत्ता काकास यांनी केला आहे. याला पुष्टी करणारे अनेक व्हिडिओही समाज माध्यमात व्हायरल होत आहेत. तर काही मतदारांना बोगस मतदान करताना पकडण्याची माहिती उमेदवारांनी दिली आहे. Buldhana: मतदानादिवशी राडा, ३ बोगस मतदारांना पकडलं; २ गाड्या भरून लोकांना आणलं; काँग्रेसचा आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईतील स्टेशनवर बेवारस बॅगेत सापडलं लाखोंचं घबाड, पैसे नेमके कुणाचे? पोलिसांना समजताच...

Maharashtra Nagar Parishad Live : बीडमध्ये निवडणुकीला हिंसक वळण, दोन गटात राडा अन् दगडफेक

kitchen Hacks: बटाट्यांना कोंब फुटलेत? नरम पडतात? १ सिंपल ट्रिक, महिनाभर राहतील चांगले

धनंजय मुंडेंचा इंदूरमध्ये हत्येचा कट? पंकजा मुंडेकडून खुलासा, राजकरणात खळबळ|VIDEO

१९ मिनिटांच्या MMS व्हिडिओनं धुमाकूळ घातला; Forward कराल तर फसाल

SCROLL FOR NEXT