
बुलडाण्यामध्ये कार आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर घडली. या अपघातामध्ये कारमधील चौघांचा मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये कार चालकाचा देखील समावेश आहे. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. पोलिस सध्या अपघाताचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर पहाटे ४ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुक्ताईनगरकडून मलकापूरच्या दिशेला जाणाऱ्या लेनवर ही घटना घडली. भुसावळवरून मलकापूरच्या दिशेला जाणाऱ्या कारने ट्रेलरला धडक दिली. चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ही कार ट्रेलरला जाऊन धडकली. मृतांमध्ये एक पुरूष आणि ३ महिलांचा समावेश आहे.
या अपघातामध्ये कारचालक साजिद अजीज बागवान यांच्यासह ३ महिला महिला असे एकूण चौघांचा जागीच मृत्यू झाला. ३ मृत महिलांची अजूनही ओळख पटू शकली नाही. हे सर्वजण कारने प्रवास करत होते. चालक साजिदचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने या कारने ट्रेलरला पाठीमागून धडक दिली. अपघातामध्ये चालकासह चौघांचा मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
गंभीर जखमींमध्ये संतोष तेजराव महाले (वय ४० वर्षे. राहणार चिखली तालुका मुक्ताईनगर), , पंकज दिलीप गोपाळ (वय २२ वर्षे. राहणार नांद्रा हवेली, तालुका जामनेर), दिपीका विश्वास (वय ३० वर्षे, राहणार कोलकाता पश्चिम बंगाल), टीना अजय पाटील (वय ४५ वर्षे राहणार भुसावळ) यांचा समावेश आहे. एका जखमी महिलेची ओळख अद्याप पटली नाही. जखमींवर उपचार सुरू असून यामधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६ [१], १२५ [बी ], मोटार वाहन कायद्याच्या सहकलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यावरून वाहनचालक आरोपी साजिद अजीज बागवान विरोधात गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मलकापूर येथील दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी चौघांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघात प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.