Nellore Accident: आजारी नातेवाईकाला भेटायला जाताना अपघात; भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Nellore Accident update : आजारी नातेवाईकाला भेटायला जाणाऱ्या एकाच कुटुंबातील ६ जणांचा अपघाती मृत्यू झाला. आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात ही घटना घडली.
Nellore Accident
Nellore Accident update Saam tv
Published On
Summary

आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

कुटुंबीय आजारी नातेवाईकाला भेटायला जाताना झाला अपघात

कार ट्रकखाली दबली गेल्यामुळे एकही जण वाचू शकला नाही

आजारी नातेवाईकाला भेटायला जाणाऱ्या एकाच कुटुंबातील ६ जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात ही अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रकच्या धडकेनंतर कारचा चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

ट्रकच्या ओझ्याखाली कार दबली गेली. या भीषण अपघातात कारमधील ६ पैकी एक जणही बचावला नाही. टी. राधा (३८), टी. श्रीनिवासुसु (४०), शेषम सरम्मा(४०), बालवेंगय्या (४५), चल्लागुंडला लक्ष्मी (३०), चंदू प्रिया (१५) यांचा अपघातात मृत्यू झाला.

Nellore Accident
Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'ट्रकने जोरदार धडक दिली की, कारमधील लोक पूर्णपणे दबले गेले. अपघातातील लोकांचे मृतदेह पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी कारमधून बाहेर काढले. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. ६ जणांच्या मृत्यूने त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Nellore Accident
Ashish Damle : परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा; अजित पवार गटाच्या पारड्यात आणखी एक मंत्रिपद

जिल्हा परिवहन आयुक्तांनी सांगितलं की, 'पेरामनजवळील रस्ते अपघातात ६ लोकांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालक चुकीच्या मार्गावरून गाडी चालवत होता. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी या अपघातप्रकरणी तपास सुरु केला आहे.

Nellore Accident
Kalyan Doctors Strike : डॉक्टरांनी दिली संपाची हाक; आरोग्य यंत्रणा कोलमडणार, काय आहे कारण?

विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू

महोबा जनपदच्या खरेला पोलीस स्टेशनच्या एचाना गावात पावसादरम्यान दुर्दैवी घटना घडली. गावातील दाम्पत्य किचनमध्ये जेवण करण्यात व्यग्र होतं. त्याचवेळी दोन्ही नवरा-बायकोंना विजेचा धक्का बसला. यात पती सुबेदार यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आशादेवी या गंभीर जखमी झाल्या. आशादेवी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com