Kalyan Doctors Strike : डॉक्टरांनी दिली संपाची हाक; आरोग्य यंत्रणा कोलमडणार, काय आहे कारण?

Doctors Strike news : सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) च्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याच्या सरकारच्या निर्देशा विरोधात डॉक्टरांचा संप आपत्कालीन सेवाही पूर्णपणे बंद राहणार आहे.
Doctors Strike
Doctors Strike news Saam tv
Published On
Summary

महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणी करण्यास मान्यता

आयएमएच्या नेतृत्वाखाली 18 सप्टेंबर रोजी राज्यभरात सर्व डॉक्टर एक दिवसाचा संप करणार.

संपादरम्यान आपत्कालीन सेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार

शासनाने निर्णय मागे घेतला नाही, तर पुढील आठवड्यात मोठा मोर्चा आणि बेमुदत उपोषण करण्यात येणार

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

kalyan news : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभागाने ५ सप्टेंबर २०२५ रोजी परिपत्रक जारी केलं आहे. सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) च्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या निर्णयाचा भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) महाराष्ट्र राज्याने तीव्र विरोध दर्शविला आहे. यामुळे डॉक्टरांनी उद्या गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय संपाची हाक दिली आहे.

आयएमएने स्पष्ट केले की, हे डॉक्टर आधीच महाराष्ट्र होमिओपॅथिक कौन्सिलमध्ये नोंदणीकृत आहेत. शासनाने घेतलेला हा निर्णय ११ जुलै २०२४ रोजीच्या स्वतःच्या परिपत्रकाच्या विरोधात आहेत. यासंदर्भातील खटला माननीय मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असताना काढलेले हे परिपत्रक कायद्याला धरून नसलेले व न्यायालयाचा अवमान करणारे आहे.

Doctors Strike
IAS Transfer : मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच बदल्यांचे आदेश; राज्यातील २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

या निर्णयामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर धोका निर्माण होईल, आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचा तसेच व्यवसायाचा दर्जा घसरेल. तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्याचे उल्लंघन होईल, अशी भूमिका आयएमएने मांडली आहे. तर अपुरे प्रशिक्षण घेतलेले डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार म्हणजे थेट त्यांच्या जीवाशी खेळ असल्याची भीतीही आयएमएकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Doctors Strike
OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

तर यासंदर्भात गुरुवारी १८ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यभरातील सर्व डॉक्टर एक दिवसाचा संप करतील. यात आपत्कालीन सेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती आयएमए कल्याणच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर यांनी दिली आहे. तसेच शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर पुढील आठवड्यात मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा आणि बेमुदत उपोषणही छेडण्याचा इशाराही आयएमएने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com