IAS Transfer : मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच बदल्यांचे आदेश; राज्यातील २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Transfer update : मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. आज मंगळवारी राज्यातील २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
IAS Transfer
IAS Transfer update : Saam tv
Published On
Summary

दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

सिद्धराम सालीमठ यांची नियुक्ती कोकण विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी

विकास पानसरे यांची नियुक्ती मुंबईतील MSSIDC चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची आरक्षणाची सोडतही जाहीर झाली आहे. दुसरीकडे शासनाकडून IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी आज दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बैठकीनंतर आज सायंकाळी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यापासून राज्यात प्रशासकीय वर्तुळात खांदेपालट पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेली अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा सुरुच असल्याचं दिसत आहे.

कुणाची कुठे बदली?

1) पुण्याचे साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांची मुंबईत कोकण विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिद्धराम सालीमठ हे २०११ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

IAS Transfer
Mumbai Local Train: लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिरा, VIDEO

2) कोकण विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त विकास मारुती पानसरे यांची बदली करून त्यांची नियुक्ती मुंबईत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. विकास पानसरे हे २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

IAS Transfer
OBC Reservation : मी लग्नासाठी तयार, आता लक्ष्मण हाके यांनी मुलगी द्यावी; मुंडावळ्या बांधलेल्या रमेश पाटलांचा व्हिडिओ व्हायरल

कोण आहेत सिद्धराम सालीमठ?

सिद्धराम सालीमठ हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. सालीमठ यांनी राहुलीच्या कृषी विद्यापीठातून एमएससी पदवी प्राप्त केली.

IAS Transfer
Famous Actress Death : हरहुन्नरी अभिनेता काळाच्या पडद्याआड; झोपेतच झाला मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

कोण आहेत विकास पानसरे?

विकास पानसरे हे २०१४ सालच्या बॅचचे अधिकारी आहेत. ते मूळचे संगमनेर येथील आहेत. त्यांनी अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीचं प्रमुख म्हणूनही काम पाहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com