Ashish Damle
Ashish Damle NewsSaam tv

Ashish Damle : परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा; अजित पवार गटाच्या पारड्यात आणखी एक मंत्रिपद

Ashish Damle News : परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा मिळालाय. अजित पवार गटाच्या पारड्यात आणखी एक मंत्रिपद पडलं आहे.
Published on
Summary

परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षांना राज्य सरकारने कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

या निर्णयामुळे बदलापूरमध्ये जल्लोष झाला आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

आशिष दामले यांनी जातीय सलोखा टिकवून समाजासाठी कार्य करण्याचा निर्धार

ashish Damle News : परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांना राज्य सरकारने कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाला. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बदलापूरमधील कार्यालयात जल्लोष केला. यावेळी बदलापूरकरांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून दामले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

कॅप्टन आशिष दामले यांची ऑक्टोबर 2024 मध्ये नव्याने तयार झालेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर नुकताच राज्य सरकारने त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा बहाल केला. दामले यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, बदलापूरकर आणि ब्राह्मण समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना कॅप्टन आशिष दामले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

Ashish Damle
बीडकरांसाठी खुशखबर! साईबाबा मंदिर अन् शनी शिंगणापूरला काही तासांत पोहोचता येणार; नवी रेल्वेमार्गिका लवकरच सेवेत

'मागील 10 ते 11 महिन्यात राज्यभरात सुमारे 80 दौरे केले असून प्रत्येक समाजबांधवांपर्यंत पोहोचून त्यांना अपेक्षित असलेलं काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दामले यांनी सांगितलं. ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी काम करत असतानाच इतर जाती आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि जातीय सलोखा कायम राहील, हे देखील परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं उद्दिष्ट असल्याचं आशिष दामले यांनी यावेळी सांगितलं.

Ashish Damle
Kalyan Doctors Strike : डॉक्टरांनी दिली संपाची हाक; आरोग्य यंत्रणा कोलमडणार, काय आहे कारण?

आशिष दामले नेमके काय म्हणाले?

आशिष दामले म्हणाले, 'मागच्या वर्षी १४ ऑक्टोबर रोजी मी मंडळाची अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर अनेक दौरे केले. सर्व समाजापर्यंत पोहोचून काम करत आहे. लोकांचे प्रश्न जाणून समस्या सोडवण्याचा मंडळाचा मानस आहे. सगळ्या लोकांना भेटून त्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेऊन काम करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा उद्देश हा प्रत्येक जातीत सलोखा निर्माण व्हावा, जातीयतेढ निर्माण होऊ नये, हे महामंडळाचं कर्त्यव्य आहे. लोकांसाठी योजना आखताना एकात्मता राहील, हे देखील पाहिलं जाणार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com